टोम्पे महाविद्यालयात स्व. केशवरावदादा टोम्पे यांच्या अस्थी 11 जुलैला दर्शनासाठी खुल्या
अमरावती -
चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष भास्करदादा के. टोम्पे, सचिव डॉ. विजय के. टोम्पे यांचे वडील तथा माजी अध्यक्ष व संस्था मार्गदर्शक स्वर्गीय केशवरावदादा टोम्पे यांचे दिनांक 08 जुलै रोजी वयाच्या 83 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पवित्र अस्थी गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूरबाजार येथे दिनांक 11 जुलै शुक्रवारला सकाळी ठीक 10 नंतर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. करिता वरिष्ठ, कनिष्ठ, एमसीव्हीसी, डीएड. व बीएड. महाविद्यालय, निर्मिती पब्लिक स्कूल येथील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि चांदूरबाजार परिसरातील नातेवाईक, मित्रमंडळी,आप्तस्वकीय सर्वांनी दर्शनासाठी उपस्थित राहावे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांनी कळविले आहे.