पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दि.19 जुलै अमरावती दौरा
अमरावती, - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या शनिवार, दि. 19 जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दौऱ्यानुसार, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांचे सकाळी नागपूरहून अमरावतीकडे प्रस्थान. सकाळी 12 वाजता सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे यश असोसिएटस् व आसरा रेस्टॉरेंट तथा कैलास छाया गिरोळकर चैरिटेबल ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यस्तरीय तेली समाज गुणवंत विद्यार्थी सोहळा व तेली समाज उद्योजक मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल येथे आरोग्य विभाग आढावा बैठकीस उपस्थिती.
दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे शंभर दिवस कृती आराखड्यातंर्गत विभागीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या कार्यालयांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता येथे घरकुल लाभार्थी यांना रेती वाटप कार्यक्रम. जिल्हा नियोजन भवन येथेच दुपारी 4 वाजता महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम तसेच दुपारी 4.30 वाजता अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना व्हॉट्स ॲप चॅट बोथ व लोगो ऑफ अमृत अंबानगरी सेवांचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जनसंवाद कार्यक्रमास उपस्थित राहणार