पंडित दीनदयाल महारोजगार मेळावा 22 जुलै रोजी

पंडित दीनदयाल महारोजगार मेळावा 22 जुलै रोजी
अमरावती -
जिल्ह्यातील तरुण-तरुणींसाठी महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय आणि सुशिला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे पंडित दीनदयाल महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात रेमंड लक्झरी कॉटन, दामोदर इंडस्ट्रीज, गुरुलक्ष्मी कोटेक्स, फ्लिपकार्ट, मुरली टोयोटा , बजाज ऑटो यांसारख्या अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, पात्र उमेदवारांना त्याच दिवशी नियुक्ती पत्रे दिली जातील.

इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी, किंवा मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणीची सोय उपलब्ध असेल. जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त यांनी जास्तीत-जास्त युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.