तुरुंग फोडणारा गुन्हेगार होता तो...
वंशपरंपरेने चालत आलेली गुलामीचे पहाड फोडणारा गुन्हेगार होता तो...
पहाड फोडुन दगडांना बाराखडी शिकवत होता तो...
ह्या आभाळावरचा बापाचा सातबारा फेरफार कोरा जरी असला तरी...
खबरदार धर्मांद ठेकेदारांनो मी मुळापासुन उपटुन टाकीन तुमची हजारो वर्षापासुन चालत आलेली बुरसटलेली सडकी व्यवस्ता...
भुक नावाची रांड होती की प्रेयसी मला माहीत नाही
पण बापाचा लय जिव होता तिच्यावर...
तो भांडायचा तिच्याशी अन सांडायचा डोळ्यातुन....
अन आभाळाकडे बघुन पच्चदिशी थुकायचा...
सिस्टमला मनातल्यामनात शिव्या हादडायचा...
मग मला छातीशी कवटाळुन उर फुगवुन म्हणायचा
खुप शिक पोरा मोठा साहेब हो...
ईथल्या मातीत माझ्याच जातीत मरायचय मला
म्हणुन पेरतोय तुला माझ्या काळजातल्या फुला...
आज कळतयं मला निरक्षर बापाच्या खोल गेलेल्या डोळ्यातलं विनचुक गणित...
माणुस म्हणुन जगतांना हे आभाळ डोक्यावर घेवुन पेलतांना...
आज कळतयं मला...
उन्हाची झळ अन पोटात कळ सोसुन गेला माझा बाप...
मला माऊलीची माया अन कायमची सावली डोक्यावर ठेवुन गेला माझा बाप....
वंश परंपरेने लादलेली सक्तमजुरी एका झटक्यात तोडुन गेला माझा बाप...
दगडं फोडता फोडता मलाही घडवुन गेला माझा बाप...
तरीही हा जाती अंताचा महाकाय तट कितीही घनांचे वर्मी घाव घातले तरी साधा तडा जात नाही...
जातबंदीचा हा बुरुज कितीही महापुषांच्या विचारांच्या अनुबाँबने कितीही सुरुंग लावले तरी ढासळत नाही...
कोसळत नाही...
कायमची मातीत मिसळत नाही...
तरीही मला चांगलं कळुन चुकलय...
ह्या देशात माझा अजुन एक बाप आहे...
तो आजही तथागतांच्या मांडीवर बसुन माझ्याकडे
डोळेभरुन पहात आहे...
अन मीही त्याने दाखवलेल्या
संघर्षाच्या वाटेने जात आहे...
त्याने पुस्तकांसाठी बांधलेल्या राजग्रहात
रहात आहे....
आकाश उर्फ तुकाराम सोनाजी सुपारे..
शेवगाव वडार गल्ली. 9822510254