अदाणी अंबानी अशा निवडक उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची खिरापत न वाटता करोडो गोरगरीबांना उभे राहण्यासाठी आधार द्यावा.भारतातील धर्मवाद , जातीवाद , विषमता संपवावा ॲड.पुरुषोत्तम खेडेकर....

अदाणी अंबानी अशा निवडक उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची खिरापत न वाटता करोडो गोरगरीबांना उभे राहण्यासाठी आधार द्यावा.भारतातील धर्मवाद , जातीवाद , विषमता संपवावा ॲड.पुरुषोत्तम खेडेकर....
                   वैचारिक संघर्ष की नक्षलवाद ?  

                संभाजी ब्रिगेडने ५ जानेवारी २००४ रोजी पुणे शहरातील भांडारकर संस्था वर जेम्स लेन प्रकरणी कारवाई केली होती . त्यावेळी आर एस एस व भाजपचे राष्ट्रीय नेते तत्कालीन प्रधानमंत्री अटलजी यांनी प्रतिक्रिया दिली होती की हे  तालिबानी कृत्य आहे . विचारांचा मुकाबला विचारांनी करावा . दुसरे पुस्तक लिहावे . इत्यादी  . आणि आता बहुजन चळवळीतील कार्यकर्ते आपले विचार लेखन कला नाट्य रिल चित्रपट कथा इत्यादी विविध तुटपुंज्या माध्यमांतून मांडत आहेत . कारण प्रमुख माध्यमे आर एस एस व भाजपच्या ताब्यात आहेत . तरीही ब्राह्मणी छावणी त्यांनाच नक्षलवादी ठरवत आहेत . सांगा आता विचारांचा मुकाबला विचाराने कसा करावा ?? अनेकदा वापरलेली भाषा अब्राह्मणी , आक्रमक वा असंवेदनशील असंवैधानिक असते .‌ असा प्रतिवाद केला जातो . बहुजन समाज आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा जेंव्हा जेंव्हा शाब्दिक विरोध करतो , तेंव्हा तेंव्हा ब्राह्मणी छावणीने अशुद्ध भाषा म्हणून अपमान केला आहे . तुच्छतेने पाहीले आहे . कारण प्रमाणित मराठी भाषा आमची मायबोली, बोलीभाषा नाही .जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले . तर महात्मा जोतिबा फुले यांचे लिखाण अशुद्ध ठरवले होते . आता परिवर्तनवादी चळवळीतील समतावादी विचारधारा नक्षलवादी ठरवत आहेत . हे चूक आहे .

               जागतिक इतिहास साक्षी आहे की केवळ भारतीय समाजातच नाही तर जगभर  सगळीकडेच दोन प्रमुख परस्परविरोधी विचारांचाच संघर्ष पहायला मिळतो . ते साधारणपणे असे - " समतावादी विरुद्ध विषमतावादी " . भारतात हेच प्रवाह प्रामुख्याने अनार्य , अवैदिक  , बहुजनवादी, संविधान वादी , पोषणवादी , पुरोगामी ,
विरुद्ध 
आर्य  , वैदिक  ,  मनुवादी , मनुस्मृती समर्थक ब्राह्मणवादी , संविधान विरोधी , शोषणवादी , प्रतिगामी अशा प्रकारे ढोबळमानाने विभागलेले आहेत . सुमारे पाच हजार वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाचे स्वरूप कालमानानुसार दोन्ही बाजूंना उपलब्ध होत गेलेल्या विविध संसाधनांच्या उपलब्धतेनुसार  बदलत गेले . भारतीय प्राचीन इतिहासानुसार मूळ भारतीय अनार्य कृषक समाज शांत कष्टाळू व समृद्ध परोपकारी होता . तर परकीय घुसखोर आक्रमक आर्य समाज ऐदी , लुटारू, भांडखोर होता .  त्यामुळे रक्तरंजित संघर्ष अपरिहार्य होता . आजच्या काळात अनार्य कृषक समाज बहुजनवादी समाज तर आर्य व त्यांचे समर्थक समाज ब्राह्मणवादी समाज म्हणून ओळखले जातात . परंतु बहुजन समाज पूर्णपणे सर्वहारा अवस्थेत आहे . तर ब्राह्मणवादी समाज सर्व सत्ताधीश आहे . याबद्दल आक्षेप नाही . तर गैरमार्गाने मिळवलेल्या सत्तेचा गैरवापर करून बहुजन समाजाला त्यांच्या मूलभूत शिक्षण घर  आरोग्य अन्न वस्त्र अशा सर्वच हक्काच्या मानवाधिकार पासून ठरवून दूर ठेवले जात आहे . याबद्दल आक्षेप आहे . याच अन्यायाविरुद्ध परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते लिहितात बोलतात गातात , वाचतात नाचतात प्रदर्शन निदर्शनं करतात , जनजागृती करतात . न्याय मागतात . संविधानाच्या चौकटीत राहून शासनाच्या दारी आपले विचार व मागणे पोचवण्यासाठी सनदशीर मार्गाने काम करतात .‌ उच्च शिक्षण , विकसित आर्थिक स्थिती , उपलब्ध जागतिक मंच , ज्ञानसाठा , नोकरी वा व्यवसाय या कारणाने बरेचसे बहुजन चळवळीतील कार्यकर्ते शहरात स्थलांतरित झाले आहेत . एकेकाळी सप्त बंदी असलेल्या सर्वहारा समाजाने संविधानाने दिलेल्या सोयींचा फायदा घेऊन बराचसा विकास केला आहे . भारतीयांना याचा अभिमान वाटला पाहिजे . ह्याच वर्गातील लहानसा वर्ग आपल्या माध्यमातून आजही जवळपास पाषाण युगात असलेल्या बांधवांना समोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे .‌ परंतू ते सर्वच समविचारी असले तरी सेम विचारी म्हणजेच एक विचारी नाहीत . परिणामी एकसंघपणा आढळत नाही  . भारतीय समाजातील धर्म जाती जमाती प्रांत भाषा मधील विभागणी इथेही आहे . यातूनच कधी कधी त्वेषाने किंवा अन्याय सहन न झाल्याने चूका होत असतील . तर संवाद व सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी शासनाने पाऊल उचलले पाहिजे .‌ सब घोडे बारा टक्के !!! ही भूमिका अयोग्य आहे . 
                    शासन मायबाप मानले जाते . कुटुंबातील दुर्बल वा दिव्यांग सदस्यांची विशेष काळजी घेतली जाते . त्याच तत्वानुसार आरक्षण , सबसिडी , मदत केली पाहिजे . अदाणी अंबानी अशा निवडक उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची खिरापत न वाटता करोडो गोरगरीबांना उभे राहण्यासाठी आधार द्यावा . भारतातील धर्मवाद , जातीवाद , विषमता संपवावी . आम्ही शेंकडों वर्षे तुम्हाला सत्ता देऊ . जंगली नक्षलवाद प्रामुख्याने घनदाट आदिवासी जंगलात वाढलेला आहे . मूळ आदिवासी नक्षलवादी नाहीत . त्यांना जगात काय चालले आहे हे माहीत नाही . गोंदिया भंडारा गडचिरोली जिल्ह्यातील खनीजांच्या विक्रीसाठी तेथील आदिवासी बाहेर काढले जात आहेत . सुरजागड एक मोठे उदाहरण आहे . तसे करण्यापूर्वी त्या त्या भागातील  आदिवासींच्या विकासासाठी हाय फाय अद्ययावत उत्तम वसाहती निर्माण केल्या पाहिजेत . प्रत्येक आदिवासी कुटुंबाला शासकीय तिजोरीतून वा खनीजांच्या विक्रीतून दरमहा आर्थिक मदत दिली पाहिजे . एकटा गडचिरोली जिल्हा हा भाग उचलण्यास सक्षम आहे .नक्षलवाद विरोधी पोलीस व अन्य यंत्रणांवर जो खर्च होतो त्यापेक्षा कमी खर्चात शंभर टक्के गरजवंत आदिवासी समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणणे शक्य आहे .  हाच महासत्ता कडे नेणारा महामार्ग आहे ‌ आर एस एस व भाजपने नकारात्मक भूमिका सोडून ह्या अंगाने विचार केला पाहिजे अशी अपेक्षा आहे . आदिवासी समाजाला हिंदू बनविण्यासाठी ताकद खर्च करण्याऐवजी त्यांना बिरसा मुंडा , जयपाल सिंग मुंडा सारखे लढवय्ये भारतीय बनवा . तसेच आपल्या धारणेनुसार माहीत असलेले शहरी नक्षलवादी निवडून त्यांच्या सोबत चर्चा करून मते समजून घेणे गरजेचे आहे . पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नसावा . ईशान्य भारतातील राज्यातील समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार नियमितपणे तेथील आदिवासी संघटनांच्या सोबत समन्वय साधून भूमिका घेत असते . त्यातूनच मार्ग निघतो . 
                चार्वाकापासून सुरू असलेली भारतीय प्रबोधन परंपरा नेहमीच मध्यम मार्ग काढत जिवंत आहे . तोच मार्ग आजही समोर ठेवून चळवळीत काम सुरू आहे . नक्षलवादी भूमिका नाही . 
+ राजहंसाचे चालणे ,
जगी झालिया शहाणे ,
म्हणूनी तेथे कोणी ,
चालेचिना . ??
--- संत ज्ञानेश्वर महाराज .
+ भले तरी देऊ ,
गांडेची लंगोटी ,
नाठाळाचे माथी ,
देऊ काठी .
--- जगतगुरू संत तुकाराम महाराज .
            ह्याच वारकरी वाटेवर चालणारे सारेच वारकरी आहेत . परंतू आमच्याही मते काही चूकीचे लोक वारीत घुसलेले किंवा घुसवलेले आहेत . हे खरे आहे . त्यांना बाहेर काढा . वारीच नाही तर भारत देश आनंददायी होईल .
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगळ्या नागरी सुरक्षा कायद्याची आवश्यकता राहणार नाही . 
जय जिजाऊ . रामकृष्ण हरी .

+ पुरुषोत्तम खेडेकर .
मोबाईल -- +९१९८२३६९३२२७