भर पावसात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे देशव्यापी संपाला पाठिंबा.
🔸 सरकारचा कामगार, शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध तहसील कार्यालयावर निदर्शने
नांदगाव खंडेश्वर -
कामगार, शेतकरी, शेतमजूर, आशा, अंगणवाडी, पोषण आहार कर्मचारी व युवकांनी दिनांक ९ जुलै चा देशव्यापी संपाला पाठिंबा देत नांदगाव खंडेश्वर येथे भर पावसात तहसील कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अ. भा. किसान सभा व सिटू चा वतीने निदर्शने करून देशातील भाजपचा मोदी सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या जनविरोधी, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक व महिला विरोधी कायदे आणि धोरणाविरोधात निषेध व विरोध करीत महामहीम राष्ट्रपतीला तहसीलदार यांचे वतीने निवेदन देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व किसान सभा जिल्हा सचिव कॉ. शाम शिंदे. यांनी केले.
या आंदोलनात १) देशातील संघटित, असंघटित कामगार व विशेषता ठेका कामगारांचे संविधानिक अधिकार हिरावून त्यांना बंधुआ मजदूर बनवू पाहणाऱ्या चार श्रम संहिता कायदा रद्द करा, २) नागरिकांचे संविधानाने दिलेल्या अधिकारांची गळचेपी करणारे महाराष्ट्रात आणत असलेले जन सुरक्षा विधेयक रद्द करा, ३) अंगणवाडी, आशा शालेय पोषण आहार कर्मचारी व शेतमजुरांना कामगार सुविधा लागू करून रुपये 26000/- किमान वेतन लागू करा, ४) शेतकऱ्यांचा शेतमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्याचा कायदा करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, ५) विजेचे नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा, विजेचे दर कमी करा, शेतकऱ्यांचा वीज पंपाला सतत बारा तास वीज पुरवण्याची हमी द्या, ६) मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान 200 दिवस काम व रु. ६००/- प्रतिदिन मजुरी द्या, शहरी भागात मनरेगा योजना सुरू करा, ७) ६० वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला प्रति महिना रुपये ५०००/- लागू करा, ८) खाजगीकरणाचा नावाखाली सरकारी उद्योग व संपत्ती उद्योगपतींचा हवाली करणे बंद करा, ९) वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कोणत्याही दोन पुराव्याचा आधारावर अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या, १०) गायरान, देवस्थान व रेव्हेन्यूच्या जमिनीचे पट्टे द्या, अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे द्या आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर रेशन कार्ड पडताळणी अर्जाचे पैसे घेऊन ग्राहकाची आर्थिक लुट करणाऱ्यावर कारवाई करा. आंदोलनात सहभागी रामदास मते, दिलीप महले, अशोक केसारखाने, मोहसीन शेख, विजय पाटील, सय्यद राजिक, रुस्तम खा पठाण, मारुती बंड, प्रतीक सुने, किशोर शिंदे, राजगुरू शिंदे, जयेंद्र सुने, पुंडलिक पुंड, कातेश्वर पुंड, रमेश काळेकर, अंकुश शिंदे, यासह आदी उपस्थित होते, जनतेला एकजूट करून शेतकरी शेतमजूर कामगार युवक महिला विद्यार्थी यांचा संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार देशव्यापी संपा निमित्त करण्यात आला.