गुजरात कांती भवन मध्ये बॉम्ब असल्याची अफवा
अमरावती -
अमरावती शहरातील गुजरात कांती भवन मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. दोन दिवसात ही दुसरी घटना असून शहरात भाम ठेवण्यात आला असल्याच्या खोट्या कॉलने पुन्हा एकदा पोलीस यंत्रणा सतर्क होऊन, श्वानपथक, बॉम्ब शोध पथक, घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची कसून झडती घेतली. मात्र घटनास्थळावर कोणताही फोटो पदार्थांना सापडल्याने पुन्हा एकदा ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. खोटा कॉल करून दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस यंत्रणे कडून कसून तपास सुरू आहे