उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलयांचा अमरावती दौरा


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
यांचा  अमरावती दौरा

             अमरावती, दि.23
 राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा शुक्रवार, दि. 25 जुलै रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:

            शुक्रवार, दि. 25 जुलै  रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह, विद्यार्थ्यांचे सामान्य कक्ष उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पीडीएससी कॅम्पस, मोर्शी रोड, येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 40 व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ, बहिरमकुऱ्हा, चांदूरबाजार येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता बहिरमकुऱ्हा येथून वाहनाने समृध्दी महामार्गाने नागपूरकडे प्रयाण.