शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं...

शेवटी फक्त मृत्यू प्रमाणपत्र उरतं...
एक निवृत्त पोलिस कमिश्नर, जे आधी आपल्या सरकारी बंगल्यात राहत होते, ते आता कॉलनीतल्या स्वत:च्या घरी राहायला आले. त्यांना आपल्याबद्दल प्रचंड अभिमान होता.

दररोज संध्याकाळी ते कॉलनीतल्या पार्कमध्ये चालायला जायचे, पण तिथे येणाऱ्या कोणालाही काही बोलायचे नाही, त्यांच्या दिशेने पाहायचेही नाही. त्यांना वाटायचं – "हे लोक माझ्या लेव्हलचे नाहीत!"

एक दिवस ते एका बाकावर बसले होते, तेव्हा एक म्हातारा तिथे येऊन त्यांच्या शेजारी बसला आणि सहज गप्पा मारायला लागला.

पण कमिश्नर साहेबांनी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. ते फक्त आपल्या बद्दलच बोलत राहिले – आपण काय पदावर होतो, आपली प्रतिष्ठा काय आहे, आपण किती मोठे आहोत…
ते म्हणाले, “मी इथे राहतो कारण हे माझं स्वत:चं घर आहे!”

असं काही दिवस चाललं. म्हातारा फक्त शांतपणे ऐकत राहिला.

शेवटी एक दिवस त्या म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केली –
"ऐका कमिश्नर साहेब, विजेचा बल्ब असतो ना – तो जोपर्यंत पेटतो, तोपर्यंत त्याचं महत्त्व. पण एकदा का फ्यूज झाला, की मग तो १० वॅट असो, २०, ४०, १०० – काही फरक पडत नाही. दिसायला तो बल्बच राहतो, पण प्रकाश देत नाही.

मी इथे पाच वर्षांपासून राहतो. पण मी आजवर कुणालाही सांगितलं नाही की मी दोन वेळा संसद सदस्य होतो."

हे ऐकल्यावर कमिश्नर साहेबांचा चेहरा बदलला.

म्हातारा पुढे म्हणाला –
"तुमच्या उजव्या बाजूला जे वर्मा बसले आहेत, ते रेल्वेमध्ये जनरल मॅनेजर होते. समोर हसत-हसत बोलणारे रावसाहेब – आर्मीमधून लेफ्टिनंट जनरल म्हणून रिटायर झालेत. आणि कोपऱ्यात जे पांढऱ्या कपड्यांत शिवाजी बसले आहेत – ते ISRO चे चेअरमन होते. पण त्यानेही कधी कोणाला हे सांगितलं नाही.

माझं फक्त एवढंच म्हणणं आहे – हे सगळे लोक इथे आहेत, मोठमोठ्या पदांवरून आलेत, पण आज सगळे एकसारखे आहेत.

मी आधीच सांगायला पाहिजे होतं – सगळे फ्यूज झालेले बल्ब एकाच गटात येतात.
कोणताही बल्ब – झिरो वॅट, १०, २०, ४०, ६०, १०० – पेटतो तोपर्यंतच महत्त्वाचा. एकदा का बंद झाला, की मग तो LED असो, CFL, हॅलोजन, डेकोरेटिव – सगळे सारखेच!

आम्ही सगळे इथे बसलेले – तुमच्यासकट – फ्यूज झालेले बल्ब आहोत.

पोवर गेले की, पोलिस कमिश्नर आणि पोलिस कॉन्स्टेबल – फरक राहत नाही.

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य – दोघंही सुंदरच असतात. पण लोक नमस्कार फक्त उगवत्या सूर्यालाच करतात. मावळत्याला कोणी विचारत नाही. हे वास्तव आपण मान्य केलंच पाहिजे.

आपण जे पद, प्रतिष्ठा, सत्ता यांमध्ये जगत असतो – ती आपली ओळख नसते. ती काही काळापुरती असते. आणि जर आपण त्यालाच आयुष्य समजत असू, तर लक्षात घेतलं पाहिजे – की एक दिवस हे सगळं संपणारच.

शतरंजात राजा, राणी, उंट, घोडा, प्यादा – यांचं महत्त्व फक्त खेळ सुरू असेपर्यंतच असतं.
एकदा का खेळ संपला – सगळेच एकाच पेटीत जातात. डब्बा बंद!

आजचा दिवस शांत आहे याचा आनंद घ्या, उद्याही शांती लाभो हीच आशा बाळगा…

आणि शेवटी… आयुष्यात कितीही सर्टिफिकेट्स, मेडल्स, पुरस्कार मिळाले – शेवटी सगळ्यांना मिळणारं एकच प्रमाणपत्र असतं… ‘मृत्यू प्रमाणपत्र!’