परतवाडा पोलीस स्टेशनची कामगिरी चोरी गेलेल्या ०३ मोटार सायकली केल्या हस्तगत

परतवाडा पोलीस स्टेशनची कामगिरी चोरी गेलेल्या ०३ मोटार सायकली केल्या हस्तगत
अमरावती -
मा. पोलीस अधिक्षक साहेब अमरावती ग्रामिण यांनी मोठया प्रमाणात होत असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या करिता विशेष सुचना दिल्या होत्या.  
 फिर्यादी राजेश पंजाबराव ढोकणे, वय ४५ वर्ष रा. सालेपुर पांढरी ता. अचलपुर जि. अमरावती यांनी दिनांक १६/०७/२०२५ रोजी पोलीस स्टेशन परतवाडा येथे रिपोर्ट दिला की, दिनांक १६/०७/२०२५ चे ११/०० वा. ते १३/०० वा. दरम्यान अग्रवाल ट्रेडर्स मिश्रा लाईन परतवाडा येथे लावलेली त्यांची मोटार सायकल क्रमांक एम एच २७ बि सी ८९४५ हिरो कंपनीची सिल्व्हर काळया रंगाची मो सा किं अं ४०,००० रु ची कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याबाबत पोलीस स्टेशनला दिलेलया रिपोर्टवरून अपराध क्रमांक ४८७/२०२५ कलम ३०३ (२), भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे संबंधाने डि बी पथक मो सा व आरोपी शोध कामी रवाना असतांना गोपनीय बातमीदारा कडुन विश्वसनीय माहीती मिळाली की, अंजनगाव स्टॉप येथे एक ईसम अंगात पिवळे रंगाचे कपडे घातलेला ही त्याचे ताब्यातील आय स्मार्ट कंपनीची मोटर सायकल विक्री करण्याचे उद्देशाने फिरत आहे. अशा माहीतीवरून अंजनगाव सटॉप येथे जावुन आरोपी नामे राहुल रामु कास्देकर वय २७ वर्ष रा. वंझर ता. अचलपुर जि. अमरावती यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन सिल्वर रंगाची काळा रंगाचा प‌ट्टा असलेली हीरो कंपनीची स्पेन्डर आय स्मार्ट MH 27 BC 8945 क्रमांकाची इंजन क्रमांक HA12EJE9D05022 चेचीस क्रमांक MBLHA12EWED0569 असलेली मो सा ताब्यात घेतली आहे. सदर मोटार सायकल संबंधाने पोलीस स्टेशन परतवाडा येथे अपराध क्रमांक ४९०/२०२५ कलम ३०३ (२) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद आहे. तसेच नमुद आरोपीस पोलिस पथकाने आणखी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याचे पोलीस सटेशन परतवाडा येथे दाखल गुन्हयातील खालीलप्रमाणे चोरी केलेल्या मोटार सायकल काढुन दिलेल्या आहेत.

०१) हिरो स्प्लेंडर iSmart MH 27 BC 8945 K.C. MOQ. रु. 40000

०२) हिरो होंडा सुपर स्लेंडर कंपनीची एमएच २७ एडब्ल्यू ८७६१ के.ची एम.एस. ते. २५००० रुपये

०३) हिरो होंडा स्पेंडर प्रो एमएच २७ एटी १७८५ क्र. ची मोहस. ते. ३०००० रुपये

अशा एकूण ०३ मो सा किंमत अंदाजे ९५,००० रू च्या जपत करण्यात आलेल्या असुन सदर मो सा संबंधाने पोलीस स्टेशन परतवाडा येथे गुन्हे नोंद आहेत.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स.पो.नि. संजय अत्राम, पो. हे. कॉ. सचिन होले, सुधिर राउत, पो.कॉ. विवेक ठाकरे, घनश्याम किरोले, शुभम शर्मा जितेश बाबील, योगेश बोदुले, पो. कॉ. सचिन कोकणे यांनी केली