माजी आमदार व मा. मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह भाजपाचे नांदगाव खंडेश्वर येथील कट्टर नेते प्रशांत वैद्य यांचा शिंदे सेनेत प्रवेश
मुंबई -
अमरावती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री जगदीश गुप्ता यांच्यासह भाजपाचे नांदगाव खंडेश्वर येथील कट्टर नेते प्रशांत वैद्य माझी महापौर, ३ माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्ष नेते आणि ७ माजी नगरसेवक ईत्यादींनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नितीन वानखेडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोंधे, माजी विरोधी पक्ष नेता सुरेंद्र पोपली यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊळकर, डॉ.राजेश जयपूरकर या ७ माजी नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोमंतका, खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल, मराठा महासंघाचे अमरावती अध्यक्ष गणेशराव रेखे, शाहु समाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला.
यासोबतच पालघर जिल्ह्यातील एकता वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष भावेश संख्ये, प्रतीक जोशी, सुमीत बारी, मारुती आव्हाड, सोहम राजपूत यांनी सुद्धा आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी एकता वाहतूक संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे. लोकांच्या अडअडचणीला धावून जाणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख आहे. आजच्या पक्ष प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत झाली आहे. गेली अडीच वर्षं मुख्यमंत्री असताना कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले असे यावेळी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रिती बंड, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग पाटील उपस्थित होते.