सर्व विभागांनी संवेदनशील घटकांसाठी सचेत राहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

सर्व विभागांनी संवेदनशील घटकांसाठी सचेत राहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

तृतीयपंथीयांच्या दत्तक बाळाला लिंग प्रमाणपत्र सुपूर्द

अमरावती, दि. 15 
कोणत्याही घटकांशी भेदभाव होणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. यासोबतच एचआयव्ही संबंधित घटकातील एचआयव्ही संक्रमित व्यक्ती, तृतीयापंथी, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, स्तलांतरीत कामगार, ट्रक ड्रायव्हर, तसेच त्यांच्या सोबत असलेले सहकारी, यांच्या संदर्भात ओळखपत्र आणि सामाजिक सुरक्षेंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजना देताना सर्व विभागांनी सचेत असावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा नुकतीच पार पडली. यात विशेष बाब म्हणून तृतीयापंथींनी दत्तक घेतलेल्या बाळाचे लिंग प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आले. लिंग प्रमाणपत्राबाबत अडचण निर्माण झाली होती. यात एक विशेष समिती स्थापन करून निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी शैलेजा एम., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आदी उपस्थित होते.

बैठकीला महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, बाह्यसंपर्क वैध्यकीय अधिकारी डॉ प्रशांत हेडाऊ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परिसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, शहरी क्षयरोग अधिकारी डॉ. फिरोज खान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी उपस्थित होते.