महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आज अमरावती जिल्हा दौरा

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आज अमरावती जिल्हा दौरा

  अमरावती -
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे उद्या, दि. 17 जुलै रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

     दौऱ्यानुसार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम हे उद्या, दि. 17 जुलै रोजी सोयीनुसार कारने नागपूर येथून अमरावतीला आगमन. सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी धारणी नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. सकाळी 11. 30 वाजता मुख्याधिकारी नांदगाव खंडेश्वर नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. दुपारी  12 वाजता मुख्याधिकारी भातकुली नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी. दुपारी 12.30 वाजता मुख्याधिकारी तिवसा, नगरपरिषद यांच्यासोबत आढावा व कामाची पाहणी तसेच भेटी व तपासणी.

      दुपारी 1.30 वाजता दस्तूर नगर येथील विवेकानंद छात्रावास येथे पारधी विकास परिषद विदर्भ प्रांताच्या बैठकीस उपस्थिती व मार्गदर्शन. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील आदिवासी विभागाच्या सर्व प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत आदिवासी विभागाचे विविध योजनेबाबत आढावा बैठक. दुपारी 4 वाजता कृषी अधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक. सायंकाळी 5 ते 6 या कालावधीत महिला व बालकल्याण तसेच क्रीडा विभाग यांच्या समवेत आढावा बैठक. रात्री मुक्काम. सोयीनुसार शुक्रवार, दि. 18 जुलै रोजी अकोलाकडे प्रमाण