नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथे पोलीस स्टेशन देण्याच्या मागणीला जोर

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथे पोलीस स्टेशन देण्याच्या मागणीला जोर
पालकमंत्री ना. बावनकुळेंशी पत्रव्यवहार ग्रामीण पोलीस अधीक्षकांना साकडे

नांदगाव खंडेश्वर -  
वाढोणा रामनाथ हे गाव अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वाशीम या चार जिल्ह्यांच्या सीमेवर असल्यामुळे गुन्हेगार इतर जिल्ह्यांत सहज पसार होतात. परिणामी पोलिसी कारवाईला अडथळा येतो. त्यामुळे येथे स्वतंत्र पोलिस ठाणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातील 10 ते गावांतील नागरिकांनी को ली 15 आहे. नांदगाव खडेश्वर तालुक्यातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या वाढोणा रामनाथ येथे पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी तीव्र झाली आहे. सध्या हे गाव
मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनपासून 18 कि.मी. अंतरावर असून आपत्कालीन प्रसंगी पोलिसांची तत्काळ मदत मिळवणे कठीण झाले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत शासन दरबारी निवेदने देऊनही अद्याप नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध आहे. वाढोणा रामनाथ परिसरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील. पोलीस स्टेशन स्थापन होईपर्यंत पेट्रोलिंग वाढविले जाईल. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील कार्यवाही होईल. पोलीस स्टेशन मंजुरीचा अधिकार महाराष्ट्र शासनाचा असून, त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो संबंधित यंत्रणेकडे पाठविला जाईल
आणि मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.                          विशाल आनंद, 
           ग्रामीण पोलीस अधिक्षक, अमरावती.

कोणताही निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना कारवाईचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत असले तरी शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
ग्रामस्थांनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिला असून, सरकार आमच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही,' असा संतप्त सूर व्यक्त केला आहे. सध्या वाढोणा हे केवळ व्यापारीच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक केंद्र बनले आहे. त्यामुळे येथे पोलिस ठाणे उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि व्यापार्यांनी व्यक्त केले आहे.