अमरावती शहरातील 'त्या' मॉलमध्ये मसाज आड चालविला जात होता कुंटणखाना !
अमरावती-
अमरावती शहर पोलिस आयुक्तालयाचे अमरावती गुन्हे शाखा युनिट-२ ने बुधवारी येथील गर्ल्स हायस्कूल चौकातील एका मॉलमधील मसाज सेंटरमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या गोरखधंद्यावर टाच आणली. तेथून देहविक्री व्यवसायातील तीन परप्रांतीय ललनांसह तीन ग्राहकांना पकडले. तेथे हजर व्यवस्थापक, जागामालक व स्पा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ जुलै रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.