नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत क्षेत्रा अंतर्गत भोगवटा धारकांना घरकुल द्या

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत क्षेत्रा अंतर्गत भोगवटा धारकांना घरकुल द्या

■ नगर पंचायत कार्यालयाची इमारत मंजूर करा

■ शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे मागणी

नांदगाव खंडेश्वर - 
        नगर पंचायत क्षेत्रा अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात यावा व नगर पंचायत कार्यालयाची इमारत मंजूर करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदन सादर करून केली
     नांदगाव शहरात अनेक वर्षांपासून शेकडो गोर गरीब नागरिक पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभा पासून त्यांचेकडे जागेचा आठ अ नसल्याने वंचित आहे शहरातील इंदिरा आवास नगर ओंकारखेडा गोवारी पुरा मातंग पुरा चांद पुरा पारधी बेडा पोलीस स्टेशन परिसर दत्त टेकडी माळी पुरा बारी पुरा जुना आठवडी बाजार परिसर तहसील परिसर चांदुर रेल्वे रोड बहिरम टेकडी या भागातील रहिवाशी नागरिकांच्या जागेला भोगवटा कर आकारण्यात आला असून यापूर्वी ग्राम पंचायत व सध्या स्थितीत नगर पंचायतनि या भागात सर्व मूलभूत सोइ सुविधा नाली रस्ते स्ट्रीट लाईट समाजभवन सभागृह इत्यादी विकास कामे सुद्धा झाली आहे म्हणून अतिक्रमण निमाकुल करण्याचा शासन निर्णया नुसार सदर भोगवटा धारक नागरिकांना त्याच ठिकाणी कायम करून घरकुलचा लाभ द्यावा व नगर पंचायत कार्यालयाचे कामकाज भाड्याच्या इमारतीत सुरू असून न प कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्द करावा तसेच नव्याने ३०० घरकुलाचा प्रस्तावास मान्यता द्यावी अशी मागणी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांनी निवेदन सादर करून केली