यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील नामवंत व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल हे सद्या उ.बा.ठा.गटात सक्रिय होते.ऐन वेळेवर त्यांची विधानसभा तिकिट कटुन माणिकराव ठाकरे यांना मिळाली होती तेव्हा पासुन थोडा नाराजी चा सुर चालु होता.मात्र गेल्या काही दिवसात मंत्री संजयजी राठोड यांचे समर्थकांनी जयस्वाल यांची मनधरनी सुरु केल्याने भविष्यातील नगर परिषद निवडणुक लक्ष्यात घेता समिकरण जुळल्याकारणामुळे ते लवकरच मंत्री संजयजी राठोड यांच्या मार्गदर्शशात शिंदे सेनेत प्रवेश करणार हे जवळपास निच्छित झाले आहे.लवकरच त्यांचा प्रवेश असल्याने त्यांचे समर्थकात आनंदाचे वातावरण आहे.