यवतमाळ येथील गजानन नगरमध्ये चाकूच्या धाकावर महिलेला लुटले

यवतमाळ येथील  गजानन नगरमध्ये चाकूच्या धाकावर महिलेला लुटले

■ जनगणनेच्या नावाखाली लुटणारी टोळी सक्रिय; महिलेचे दागिने केले लंपास

यवतमाळ -

 यवतमाळ शहरात जनगणनेच्या नावाखाली लुटणारी टोळी सक्रिय झाली असून चाकूचा धाक दाखवून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे नेकलेस, अंगठी आणि रोख हिसकावण्यात आली. ही धक्कादायक घटना शहरातील धामणगाव मार्गावर असलेल्या मासोळी गावाजवळील गजानन भाग दोन येथे सोमवार, दि. ३० जूनला दुपारी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून नागरिकांनो सावधान... म्हणण्याची वेळ आली आहे. या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर येवून ठेपले आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील घामणगाव मार्गावर असलेल्या मासोळी गावाजवळील गजानन भाग दोन येथील रहिवाशी प्राची गुल्हाणे वय २८ वर्ष यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार, सोमवारी दुपारच्या वेळी पत्नी बाथरूममध्ये बंद असल्याचे आले दिसून जनगणना करण्यासाठी दोन व्यक्ती घरी आल्याची माहिती प्राची गुल्हाने यांनी पती अमोल यांना फोनवर दिली, त्यानंतर पतीचे सर्वे करणाऱ्यांसोबत बोलणे करून दिले. यावेळी पतीने अर्धा तास थांबा मी घरी येत आहे असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने पतीने पत्नी प्राची गुल्हाने हिला कॉल केले, मात्र तीने रिसिव्ह केला नाही. त्यानंतर तब्बल पंधरा कॉल केले, तरीही कुठला प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे पतीला संशय आल्याने त्यानं घर गाठले असता, पत्नी बाथरूममध्ये बंद असल्याचे दिसून आले. सुमारास दोन अनोळखी युवक जनगणना करण्यासाठी आलो असल्याचे सांगत त्यांच्या घरात शिरले. दरम्यान त्यांची विचारपूस करीत अचानक त्यांना चाकूचा धाक दाखवून किचनमध्ये घेऊन गेले, त्यानंतर गळ्यातील सोन्याचा नेकलेस आणि हातातील अंगठी हिसकावून घेतली. 

                काय म्हणाली पिडीत महिला

सोमवारी दुपारी दोन व्यक्ती घरी आहे. आम्ही जनगणनेचा सर्वे करण्यासाठी आलो असे म्हणाले. दोन्ही व्यक्ती शटींग करून होते, त्यांच्या गळ्यात ओळखपत्र होते आणि हातात रजिस्टर होते. त्या रजिस्टरवर अनेकांची नावे होती. त्यामुळे ते सर्वे करणारे असेल असे वाटले.

             - प्राची गुल्हाने, पीडित महिला.

दरम्यान बेडरूममधील कपाट उघडण्यास सांगून त्यामधील बारा हजार रुपयाची रोख हिसकावून महिलेला बाथरूनमध्ये बंद करीत पळ काढला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून पाहाणी केली. त्यानंतर महिलेने शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दिली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी लुटमारी करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.