स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभ

स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभ
नांदगाव पेठ / प्रतिनिधी

    येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयात बी.ए. भाग एक ला प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे हे होते.विद्यापीठ गीताने दीक्षारंभ कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला हारार्पण करून दीप प्रज्वलित  करण्यात आले. 
     महाविद्यालयात शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ या वर्षात बी.ए. भाग एकला प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आणि महाविद्यालयातील विविध उपक्रमांची आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती होण्याच्या दृष्टिकोनातून सदर दीक्षारंभ समारंभाचे आयोजन करण्यात आले. बी.ए. भाग एकच्या प्रवेश समितीचे आणि या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गोविंद तिरमनवार यांनी सुरुवातीला प्रास्ताविकातून सदर समारंभाच्या आयोजनाची भूमिका विशद करीत उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
       सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉ. पंकज मोरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची सर्व विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. यानंतर डॉ.सुनिता बाळापुरे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची रचना व अभ्यासक्रम याविषयीची विस्तृत माहिती नवप्रवेशित विद्यार्थ्यांना दिली. महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पी आर जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. श्रीकांत माहुलकर यांनी खेळ व क्रीडा याविषयीची, सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गोविंद तिरमनवार यांनी युवा महोत्सव व  महाविद्यालयाच्या युवा आविष्काराबाबत,ग्रंथपाल डॉ.विकास अडलोक यांनी ग्रंथालायाविषयी ,डॉ. सुनिता बाळापुरे यांनी महाविद्यालयीन व विद्यापीठ परीक्षा संदर्भातील आणि श्री दिलीप पारवे यांनी शिष्यवृत्ती व इतर योजनांविषयीची विस्तृत माहिती नव्याने प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे यांनी सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालय व महाविद्यालयातील सर्व उपक्रमांविषयीची आवश्यक ती सर्व माहिती देत योग्य असे मार्गदर्शन केले.
      दीक्षारंभ कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील बी.ए.भाग दोन व तीनच्या विद्यार्थ्यांनी नव
 प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.पंकज मोरे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.डॉ. पी आर जाधव, डॉ. राजेश ब्राह्मणे ,डॉ.श्रीकांत माहुलकर, डॉ. सुनिता बाळापुरे, डॉ.सुभाष पवार ,डॉ. विकास अडलोक ,श्री दिलीप पारवे,रेखा पुसतकर, विनायक पावडे,राहूल पांडे, अनिल शेवतकर,कोठार महाराज यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.निहारिका डोईफोडे, वैष्णवी गायकवाड, गायत्री सावरकर, ओम शेंदरकर, रोशन कामडी, योगेश महाजन यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.