डॉ.मोनाली ढोले 'ओबजी पिलर्स ऑफ प्रोग्रेस अवार्ड' ने सन्माानित

डॉ.मोनाली ढोले 'ओबजी पिलर्स ऑफ प्रोग्रेस अवार्ड' ने सन्माानित
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची घेतली दखल 

अमरावती :
 सोलापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट सोसायटीच्यावतीने दोन दिवशीय 'फोगसी प्रेसिडेन्शिअल कॉन्फरंस'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अमरावती जिल्हा स्त्रीरोग व प्रसुती संघटनेच्या माजी सचिव सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ.मोनाली ढोले यांना 'ओबजी पिलर्स ऑफ प्रोग्रेस अवार्ड' देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
सोलापूर येथील बालाजी सरोवर येथे १९ व २० जुलैदरम्यान सोलापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट सोसायटीच्यावतीने 'फोगसी प्रेसिडेन्शिअल कॉन्फरंस'चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत रोटरी क्लब ऑफ अंबिकाच्या माजी अध्यक्षा अमरावती जिल्हा स्त्रीरोग व प्रसूती संघटनेच्या माजी सचिव डॉ.मोनाली ढोले यांनी उपस्थिती दर्शवून 'अल्ट्रासाउंड एडिशन व्हॅल्यू टू प्रॅक्टिस' या विषयावर आपले विचार मांडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 'ओबजी पिलर्स ऑफ प्रोग्रेस अवार्ड' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध रक्ततज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञासह प्रख्यात वक्त्यांनी ओबजीमधील एमआरआय, जेनेटिक्स या विषयावर आपले मत व्यक्त केले. डॉ.मोनाली ढोले यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्या प्रगत वंध्यत्व उपचार, कुटुंब नियोजन सेवा 
गरिबांपासून तर समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सोसायटीने त्यांचा हा सन्मान केला आहे. या सन्मानाबद्दल डॉ.ढोले यांनी मोनिका शशिकांत उंबरदंड, मिलिंद शहा, सुजाता कुलकर्णी यांचे आभार मानले.