माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिवस साजरा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिवस साजरा
वृद्धाश्रमात फळ,वस्त्र, मेडिकल किटचे वितरण
ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार

अमरावती / प्रतिनिधी

      शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना अमरावती तालुक्याच्यावतीने सेवा दिन साजरा करत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कर्मयोगी गाडगे महाराज वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना फळ वाटप, वैद्यकीय किट वितरण तसेच वस्त्रदान करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान व सत्कारही करण्यात आला.
    शिवसेना तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम  पार पडला. या कार्यक्रमाला माजी खासदार अनंतराव गुढे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ, विधानसभा संघटक डॉ. नरेंद्र निर्मळ,महानगर प्रमुख प्रवीण हरमकर,डॉ. चंद्रकांत गिरी, उपतालुकाप्रमुख अभिलाष वानखडे, अंजनगाव सुर्जी तालुकाप्रमुख कपिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
      शिवसेनेने नेहमी राजकारणासोबत सेवाभाव जपलेला आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेने सेवादिनाच्या माध्यमातून जेष्ठ नागरिक तसेच वृद्ध मातापित्यांना आवश्यक व गरजेच्या वस्तू देऊन त्यांना एक हात मदतीचा दिला आहे. यावेळी पक्षातील जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार देखील पार पडला. या सेवा दिनाच्या माध्यमातून अनेक शिवसैनिक एकत्र येवून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्याची कामना केली. 
     यावेळी दिलीप चौधरी, मंडाळकर, बाळासाहेब उगले, अविनाश वानखडे, अनिल सोनटक्के, मनोज मोरे, सचिन पाटील, काळे, दिनेश कुर्हेकर, शिवाजी चौधरी, भारत चौधरी, सचिन मोहिते, विनोद काळे, पंडितराव ठाकरे, कपिल देशमुख, विजुभाऊ बेडकर, अफसरभाई, राजू कुर्हेकर, संदीप वैद्य, दिलीप काकडे, योगेश ठाकूर, प्रफुल गाढवे, राजूभाऊ पोकार, बाळासाहेब बोबडे, संतोष निर्मळ, अक्षय पोहकार, देविदास बोरकर, साहेबराव बोबडे,वैभव मोहकार,भारत गभने,भूषण बोराळकर यांच्या सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.या उपक्रमातून शिवसेनेचा समाजाभिमुख चेहरा पुन्हा अधोरेखित झाला असून, उपस्थितांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.