वाईन शॉपजवळ मद्यपान करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

वाईन शॉपजवळ मद्यपान करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
अमरावतीत एकाचवेळी १६ जणांवर गुन्हे दाखल

अमरावती / प्रतिनिधी

     किरकोळ मद्य विक्री (वाईन शॉप) जवळ मद्यपान करणाऱ्या ग्राहकांना मोकळे रान उपलब्ध देणाऱ्या दुकानदारांवर आणि अशा ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ग्राहकांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावतीने मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांत शहर व परिसरातील चार ठिकाणी धडक छापे टाकून एकूण १६ जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
   राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार, विभागीय उपआयुक्त डॉ. पराग नवलकर आणि अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.कारवाईदरम्यान अमरावतीतील वडाळी , बडनेरा,राष्ट्रीय महामार्गावरील आणि नवाथे चौक परिसरातील वाईन शॉप लगत असलेल्या स्नॅक्स, कोल्ड्रिंक व ड्रायफ्रुट दुकांनांमध्ये मद्यपान सुरू असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकांनी एकाच वेळी संबंधित ठिकाणी छापे टाकले.
      सुंदरलाल चौकस्थित बालाजी लिकर्स किरकोळ मद्य विक्री (वाईन शॉप) लगत असलेल्या दिशा स्नॅक्स, ड्रायफ्रुट्स व कोल्ड्रींक्स,नवाथे चौक अमरावती येथील वाईन गॅलरी मद्यविक्री दुकानालगत असलेल्या महाकाल स्नॅक्स ड्रायफ्रुट्स अॅन्ड कोलड्रींक्स,दस्तुर नगर, बडनेरा रोड वरील आदीत्य वाईन शॉप किरकोळ मद्य विक्री (वाईन शॉप) लगत असलेल्या गजानन स्नॅक्स सेंटर अॅन्ड कोल्ड्रींक तसेच बोरगाव धर्माळे येथील मेजवानी ढाबा याठिकाणी अनधिकृतरित्या ग्राहकांना मद्य पिण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे दुकान मालक अविश कमलाकर देशपांडे, प्रेमकुमार आतमदेव कापडी, विनय नाना सावनेरकर,देवेंद्र मुरलीधर चरोडे या दुकान मालकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ (अ) व (ब) अन्वये तसेच मानिक माहागाजी वरकडे,रोशन विठ्ठल काळे,सागर जानरावजी येवतकर,आकाश रविंद्र रॉय,मनन संदीप अग्रवाल, सारांश सुजीत देशमुख,विश्वेंद्र विरेंद्र ठाकुर,अनुप अरुण मुंधडा,शिरीष दिगांबर अवघाते,सुमित अनिल मोकनेअभिषेक मानिकराव घोगरे,चंद्रशेखर श्रीकृष्ण तायडे या ग्राहकांवर कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
    सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक  सुभाष खरे, मुकुंद चिटमटवार, प्रभारी निरीक्षक संतोष  वायाळ, दुय्यम निरीक्षक सादीक नौरंगाबादे, सागर  वानखडे, प्रशांत वानखडे, कुंदन कुमरे,सहायक दुय्यम निरीक्षक अरविंद नांदने व जवान सुमित काळे, राहुल मोहीते, संदीप पेंढारकर, रुपेश मोकलकर, गजानन वाकोळे, विठ्ठल कष्टे, जगदीश चव्हाण, सुजीत जाधव, निलेश शेळके, भुषन नवघरे, सतिश बंगाळे, महिला जवान कु. कल्याणी दातीर, कु. दिपावली मानकर, कु. दिव्या खंडारे, कु. समिक्षा तायडे, सौ. वैशाली पारखी यांचे संयुक्त पथकाने केली.