आषाढी एकादशी निमित्त गुरू ग्लोबल स्कुल मध्ये विविध उपक्रम
नांदगावपेठ / प्रतिनिधी
येथील गुरू ग्लोबल स्कुल मध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा साकारत परीसरातून दिंडी काढली.
सकाळी कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी फुगड्या, रिंगण, उखाणे, भजन सादर केले.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषामुळे परिसरातील नागरिकांनी पंढरपूर येथील सोहळा शाळेतच अनुभवला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये मुख्याध्यापिका अश्विनी मानेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका भाग्यश्री भगत, अंकिता पोटोडे, साक्षी भटकर प्रतीक्षा बावनकुळे, अविनाश शिंदे यांचेसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचाही मोलाचा सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक घडणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या आयोजनाचे सर्वच स्तरातून गौरवले जात आहे.