मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायची ईच्छा अपुर्ण

मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायची ईच्छा अपुर्ण 
मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचे होते. त्याने घरी बारा डॉक्टर नेमले जे दररोज केसांपासून ते नखांपर्यंत त्याची तपासणी करायचे. जेवण्यापूर्वी त्याचे अन्न नेहमीच प्रयोगशाळेत तपासले जायचे. त्याच्या दैनंदिन व्यायाम आणि कसरत पाहण्यासाठी आणखी पंधरा लोक नेमले गेले. त्याच्या बेडवर ऑक्सिजनची पातळी नियंत्रित करणारे तंत्रज्ञान होते. अवयवदाते तयार ठेवण्यात आले होते जेणेकरून जेव्हा गरज पडेल तेव्हा ते त्यांचे अवयव त्वरित दान करू शकतील. या दात्यांची देखभाल तो स्वतः करत असे. तो १५० वर्षे जगण्याचे स्वप्न घेऊन पुढे जात होता. पण २५ जून २००९ रोजी, वयाच्या फक्त ५० व्या वर्षी, त्याचे हृदय बंद पडले‌.त्या १२ डॉक्टरांच्या सततच्या प्रयत्नांना यश आले नाहीच पण लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्नियातील डॉक्टरांचे एकत्रित प्रयत्नही त्याला वाचवू शकले नाहीत. गेल्या २५ वर्षांपासून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एक पाऊलही पुढे न टाकणारा तो १५० वर्षे जगण्याचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही.

 जॅक्सनचा अंतिम प्रवास २५ लाख लोकांनी थेट पाहिला, जो आजपर्यंतचा सर्वात मोठा लाईव्ह टेलिकास्ट ठरला. ज्या दिवशी तो मरण पावला, म्हणजेच २५ जून २००९ रोजी दुपारी ३.१५ वाजता, विकिपीडिया, ट्विटर, एओएलचे इन्स्टंट मेसेंजर हँग झाले. कारण लाखो लोक गुगलवर मायकल जॅक्सनला सर्च करत होते. 

जॅक्सनने मृत्यूला आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण मृत्यू कुणालाच चुकत नाही..त्याला चकवता येत नाही.
जीवनाच्या शेवटी ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे  समाधान आणि शांती. दुर्दैवाने, या खरेदी करता येत नाहीत.