मोर्शी तालुक्यात केबल चोरी करणारे चोरटे अखेर गजाआड
गुन्हेगारी चोरी ईत्यादी गैरकृत्याची माहिती असल्यास तात्काळ कळवा - नवनियुक्त ठाणेदार सुरज बोंडे
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खेड्यापाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतातील वायर विहिरीवरील मोटार चोऱ्या फार मोठ्या वाढलेल्या प्रमाणात होत्या. अशातच या दहा-बारा दिवसांत दोन ते तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या व तशा तक्रारीसुद्धा पोलिसस्टेशनमध्ये दाखल झाल्या.
२७ जून रोजी मनोहर पंजाबराव भोरे व शेजारील शेतातील पन्नास फूट केबल वायर अंदाजे १२ हजार रुपये किमतीचा तसाच श्रेयस नरेंद्र काळे बालाजी नगर
यांच्या शेतातील विहिरीवरून मोटर पंप ३० फूट केबल तसेच मत्स्य विद्यालय येथून सात इलेक्ट्रिक पोलवरील बाराशे पन्नास मीटर ५५ जर्मन तार चोरीला गेला होता नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक सूरज बोंडे यांनी एक अधिनस्त गुन्हे पथक तयार करून गुन्ह्याचा छडा लावला व
चोरटे ताब्यात घेतले. आरोपी मनीराम हरिदास घोळ रा. नशीबपूर, मनोज धनराज मळावी यांना मुद्देमालासह घेतले, तसेच मोटरपंप ताब्यात केबल तांब्याचा तार इलेक्ट्रिक पोलवरील चार पदरी अल्युमिनियमचा तार व गुन्ह्यात डिस्कवरी वापरलेली बजाज
मोटरसायकल आरोपी गोलू ऊर्फ सदानंद नथुजी ठाकरे यांच्या घरून जप्त केली.
ही कार्यवाही ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सूरज बोंडे ठाणेदार पो. स्टे. मोर्शी यांच्या नेतृत्वात पो. स्टे. मोर्शी येथील पोउपनि तुषार चव्हाण, छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर यांनी केली असून पुढील तपास मोर्शी पोलिस करीत आहेत.