अनाथ मुलांच्या मदतीसाठी तहसिलदार वैशाख वाहुरवाघ सह सरसावले आर्णीकर
आर्णी -
सावळी सदोबा माळेगाव येथील अनाथ झालेल्या दोन भावंडांसाठी या समुहाने मदतीचा हात पुढे करत एक आदर्श निर्माण केला आहे.
ही घटना व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाली तेव्हा राम पवार (माळेगाव) यांनी संबंधित मुलांबाबतची माहिती एका व्हॉट्सअॅप समुहावर शेअर केली होती. त्यानंतर पत्रकार बंधूंनी या प्रकरणाची दखल घेत प्रसारमाध्यमांद्वारे वृत्त प्रकाशित केले. वृत्त समजताच आर्णीचे तहसीलदार तात्काळ माळेगाव येथे पोहोचले आणि स्वतः त्या
भावंडांची भेट घेऊन त्यांना कपड्यांचे वाटप केले. यानंतर संबंधित व्हॉट्सअॅप समुहातील काही मान्यवर सदस्यांनी एकत्र येऊन आर्थिक मदत उभारली. या सामाजिक उपक्रमात तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनीही आपली माणुसकीची जबाबदारी पार स्वतःहून त्यात भर घातली. त्याशिवाय अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीवास यांनी या दोन्ही भावांना नवीन कपडे भेट देऊन मोलाचं सहकार्य केले.
यावेळी प्रमोद कुदळे, रवी राठोड, मनोज माघाडे, परवेज बेग, राम पवार, रुग्णसेवक निलेश आचमवार आणि रियाज सय्यद हे मान्यवर उपस्थित होते. (वार्ता.)