मुंबई येथील SRCC हॉस्पिटल येथे आमदार प्रतापदादा अडसड यांनी घेतली माहेश्वरीची भेट.
माहेश्वरीच्या मदतीला आमदार प्रतापदादा अडसड यांची साथ.
अमरावती -
जन्मताच पायाला अपंगत्व, घरची परिस्थिती हालाकीची, रुग्णालयाचा खर्च तब्बल सहा लक्ष रुपये अश्या परिस्थितीत आमदार प्रतापदादा अडसड यांनी केली मदत.
माहेश्वरी साजन पवार राहणार शिरपूर पारधी बेडा ता.नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती साजन पवार यांच्या मुलीच्या पायाची शस्त्रक्रिया आमदार श्री.प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नाने मुंबई येथील SRCC हॉस्पिटला विनाशुल्क करण्यात आली. एका सामान्य कुटुंबातील पारधी बेड्या वर राहणारी व्यक्ती परिस्थिती अभावी जन्मताच आपल्या मुलीच्या पायाला अपंगत्व, डॉक्टरनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला परंतु शस्त्रक्रियेचा खर्च परिस्थितीला न झेपणारा. यातूनच आमदार प्रतापदादा अडसड यांच्याशी संपर्क केला असता साजन पवार यांची परिस्थिती आमदार प्रतापदादा अडसड यांना माहिती होताच अडसड यांनी तत्काळ रुग्णालय प्रशासनाला कॉल करुन विना शुल्क ऑपरेशन करण्या संदर्भात निर्देशित केले व माहेश्वरीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. यासाठी सर्व पारधी समाज बांधवांनी दादांचे आमदार प्रतापदादा अडसड यांचे मनस्वी आभार मानले.