पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या दि.3 दौरा

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्या दि.3 दौरा
अमरावती -
दि. २ : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रविवार, ३ ऑगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 
दौऱ्यानुसार तीन ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मोर्शी येथे विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतील. यामध्ये शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा, शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्रक्षेत्र इमारतीचे लोकार्पण, तर दूरदृश्य प्रणाली व्दारे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० गावांमध्ये शिवाजी महाराज उद्यानांचे भूमिपूजन, 'एक पेड माँ के नाम' आणि 'हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र' अभियानांतर्गत ५०१ वृक्षांची लागवड, आणि अपंगांना बाईक वाटप तसेच विविध शासकीय विभागांचे लोकार्पण व भूमिपूजन यांचा समावेश आहे.

 सायंकाळी ६ वाजता अमरावती येथील मातोश्री विमलाताई देशमुख सभागृहात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी व गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रमास उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वाजता अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथील नवीन सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता अमरावतीहून नागपूरकडे प्रयाण करतील.