आजाद समाज पार्टी (कांशीराम) तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अमरावती / प्रतिनिधी
आजाद समाज पार्टी (कांशीराम) तर्फे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चैतन्य कॉलनी येथील पक्ष कार्यालय येथे ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक सलोखा राखण्यात आला.
यावेळी माजी लेफ्टनंट कमांडर अविनाश गायकवाड व त्यांच्या टीमसह, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनीष भाई साठे, महाराष्ट्र प्रवक्ता प्रमोद मेश्राम, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे, तसेच विदर्भ उपाध्यक्ष रवींद्र फुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यानंतर संविधान निर्माते विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमटेकडीवरील पुतळ्यास अभिवादन करून मानवंदना अर्पण करण्यात आली.या प्रसंगी मीना दंदे यांची आजाद समाज पार्टी नांदगाव खंडेश्वर महिला आघाडी तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमाला ट्रायबल फोरमचे सुंदरलाल उके, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सनी भाऊ चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष विजय सवई, जिल्हा संघटक धर्मपाल पिलावण, जिल्हा सचिव भूषण राऊत, जिल्हा सदस्य अतुल गायगोले, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मेराज बाजी, वंदनाताई बोरकर, युवा आघाडीचे शहराध्यक्ष नितीन काळे, ब्लॉक अध्यक्ष डॉ. जुबेर खान, शहर उपाध्यक्ष जितेंद्र रामटेके, शहर महासचिव ज्ञानेश गडलिंग, मुस्ताक भाई, अशोक इंगोले, संजय भाऊ आठवले, सुरेंद्र नितनवरे, लक्ष्मण वाघमारे, आनंद बारसे, भारत सोनवणे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.