नांदगाव खंडेश्वर येथील सौ.योगिता नितीन टाले यांना आचार्य (पीएचडी) पदवी

नांदगाव खंडेश्वर येथील सौ.योगिता नितीन टाले यांना आचार्य (पीएचडी) पदवी
अमरावती (प्रतिनिधी)-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत भूगोल विषयात सौ. योगिता नितीन टाले यांना आचार्य (पीएचडी) पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी यवतमाळ शहराच्या विकासातील अभिक्षेत्रिय व कालनिहाय बदलांचे भौगोलिक अध्ययन या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन केले.

या संशोधनामधून शहराचा कालानुरूप विकास, शहरीकरणाची प्रक्रिया, भौगोलिक बदल आणि भविष्यातील नियोजनाची दिशा यांचा सखोल अभ्यास झाला आहे. या अभ्यासाचा लाभ केवळ - भावी संशोधकांनाच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनालाही होणार असून शाश्वत शहरीकरणाला दिशा
मिळणार आहे. हे संशोधन कार्य प्रा. डॉ. अरुणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. सौ. टाले यांनी प्राचार्य श्रीकांत दांडगे, प्रा. डॉ. पी. एच. सूर्यवंशी, प्रा. डॉ. सुनील आखरे, प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे, प्रा. डॉ. मनोज गाथे, प्रा. डॉ. राजेश मेश्राम, प्रा. गौतम सातदिवे, प्रा. डॉ. विवेक चौधरी, प्रा. डॉ. चंदा जगताप, प्रा. निलेश गोरे, प्रा. गजानन काकडे, प्रा. रुपेश फुके, प्रा. सुरेंद्र खेडकर, शाम ठाकरे, नंदकिशोर काजे व ऋतुजा देशमुख यांचे मोलाचे सहकार्याबद्दल आभार मानले.