चांदुर रेल्वे पोलिसांची गांजा तक्करावर मोठी कार्यवाही

चांदुर रेल्वे पोलिसांची गांजा तक्करावर मोठी 
कार्यवाही अमरावती - 
चांदुर रेल्वे पोलीसांची १११ किलो गांजा जप्त करुन चार चाकी वाहनासह दोन आरोपी पकडुन गांजा तस्करावर धडक कार्यवाही केली या घटनेचा सविस्तर वृत्तात असा की, दि.२२/०८/२०२५ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे यांना गोपनिय बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, दोन इसम हे गांजा नावाचे अंमली पदार्थ घेवुन चारचाकी वाहनाने नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे. अशा मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे सदरच गोपनिय खबरेची शहानिशा केली असता दोन इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ विकी करण्याकरीता स्वतः जवळ बाळगुन चारचाकी वाहनाने नांदगाव खंडेश्वर रोडने जाणार आहे सदरची माहीती वरीष्ठांना देवुन गांजा रेड कामी राजपत्रीत अधिकारी नायब तहसिलदार श्री. दोन शासकीय पंच, फोटोग्राफर, वजन मापारी वजन काट्यासह व पोलीस स्टॉपसह नांदगाव खंडेश्वर रोडने गेलो असता ग्रम पळसखेड फाटयासमोर खबरेप्रमाणे एक चारचाकी बोलेरो गाडी येताना दिसली सोबतच्या पोलीस स्टॉपच्या मदतीने गाडी चालकास थांबविण्याचा इशारा केल्याने चालकाने सदरची वाहन थांबवुन वाहनातील इसमांना विचारपुस केली असता चालक नामे यश भास्करराव लाहे वय २१ वर्ष रा पिपंळगाव बैनाई ता नांदगाव खंडेश्वर जि अमरावती व बाजुचे सिटवर बसलेला इसम नामे फिरोज सैयद अनवर सैयद वय ३६ वर्ष रा. जी २१६ सॅन्ड ब्रीक शॉप प्रकाश नगर न्यु आगरी पाडा अलीयावर जंग मार्ग, साताकृझ इस्टे मुंबई असे सांगितले. त्याचे बोलेरो गाडी क OR 10 H 6256 ची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध अंमली पदार्थ गांजा वजन १११ किलो ६०० ग्रॅम कि.अ. २५,६६,८००/रू, मिळुन आला नमुद आरोपीचे ताब्यातुन बोलेरो गाडी क OR 10 H 6256 कि.अ. १०,५०,०००/रू, एक अॅपल मोबाईल कि. अ. १,००,०००/रू, एक रेडमी मोबाईल कि.अ. ९,०००/रू, एक टॅब कि.अ. १०,०००/रू व नगदी ६,६००/रू असा एकुण ३७,४२,४००/रू चा माल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरूध्द कलम ८ (सी), २० (बी) (ii) (सी) २९ NDPS अॅक्ट करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक सा.श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. श्री पंकज कुमावत सा. उपविभागीस पोलीस अधिकारी सा. श्री अनिल पवार, पोलीस निरीक्षक अजय आकरे, यांचे मार्गदर्शनामध्ये सपोनि शरद आहेर, पोउपनि रोहीत कुदळे, पोउपनि नंदलाल लिंगोट, पोलीस अंमलदार शिवाजी घुगे, प्रविण मेश्राम, राहुल इंगळे, निलेश रिठे, प्रशांत ढोके, संदीप वासनिक, संदीप बटुकले, ऋषीकेश जगदाळे, महीला पोलीस अंमलदार किर्ती सयाम, चालक प्रकाश बिरोले, चंद्रकांत गाडे यांनी केली.