गुरु ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गुरु ग्लोबल स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नांदगाव पेठ / प्रतिनिधी

       येथील गुरू ग्लोबल स्कुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सकाळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, देशप्रेम जागवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण देशभक्तीमय केले
    या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संदीप कापडे , भारतीय सीमेवर तैनात जवान सचिन शेंदरकर, सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर इंगळे, संस्थेचे अध्यक्ष अशोकराव मानेकर, संचालक आनंद मानेकर व नूतन मानेकर, तसेच पालक प्रतिनिधी राम अग्रवाल, बाळा देशमुख, सचिन हटवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 
    मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या प्राचार्या अश्विनी मानेकर यांच्यासह शिक्षिका अंकिता पडोळे, भाग्यश्री भगत, साक्षी भटकर, बावनकुळे, अविनाश शिंदे व इतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.