अल्पवयीन मुलगा फिरत होता देशीकट्टा घेऊन पुसद पोलिसांनी केली तात्काळ कारवाई
यवतमाळ -
जिल्ह्यातील एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून देशी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई पुसद ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास कवडीपूर परिसरात केली.
कवडीपूर परिसरातील कॅनॉलजवळ एक अल्पवयीन मुलगा देशी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून विधिसंघर्षग्रस्ताची चौकशी केली. अंगझडती घेतली असता देशीकट्टा आणि दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडे मिळून आले. पोलिसांनी या प्रकरणी शस्त्र अधिनियमचे कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद नोंद केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत, पोलिस उपनिरीक्षक राहुल देशमुख, पोलिस कर्मचारी पंकज पातूरकर, चालक प्रवीण इंगोले, अक्षय मोटे आदींनी केली.