मित्रासोबत दुचाकीने फिरायला जाने विद्यार्थीनीला भोवले अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू मित्र बचावला

मित्रासोबत दुचाकीने फिरायला जाने विद्यार्थीनीला भोवले अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू मित्र बचावला
अमरावती - 
यवतमाळ येथुन मित्रासोबत दुचाकी वर फिरायला निघालेल्या विद्यार्थिनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ बायपास रोडवर घडली आहे. बी फार्मसी कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील 18 वर्षीय शुभांगी शिंदे ही आपल्या मित्रासोबत फिरायला देवगावकडे दुचाकीने गेली होती. आशुतोष तापडिया वय वर्ष 22 या तिच्या मित्राला मागे बसून स्वतः दुचाकी शुभांगी चालवत होती. बायपास वर एका वळणावर तिचा तोल सुटला कारणाने दुचाकी अनियंत्रित झाली व कडेला दोघेही पडले त्यात शुभांगी हिला गळ्या जवळ मोठी दुखापत झाली व आशुतोष याला युवकाला पायाला मार लागला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती काही नागरिकांनी 112 वर दिली असता 112 वर चालक मनोज धोटे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले त्यांनी अनेकांना शुभांगीला उचलण्याकरता मदत मागितली परंतु जमा झालेल्या त्या नागरिकांनी बघायची भूमिका घेतली होती कसेबसे मनोज धोटे यांनी वेळ न गमवता जखमी युवती व युवकाला 112 मध्ये टाकले व लगेच ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे ते उपचारा करीत आणले. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरु केला

मात्र दुर्दैवाने शुभांगी हिची प्राणजोत मावळली होती व डॉक्टरने तिला मृत घोषित केले. युवकावर उपचार करण्यात आला शुभांगी हिच्या पालकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. दत्तापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनेचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे.