शिक्षण उपसंचालक निलिमा टाके - गुल्हाने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

शिक्षण उपसंचालक निलिमा टाके- गुल्हाने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित 
अमरावती (प्रतिनिधी) 
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समिती आयोजित तेली समाज मेळाव्यात अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक निलिमा टाके - गुल्हाने यांना तेली समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
 महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समितीचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठून शिक्षण उपसंचालक पदापर्यंत मजल मारणाऱ्या अमरावती विभागाच्या शिक्षण उपसंचालक निलिमा सचिन गुल्हाने - टाके यांना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तेली समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समितीचे महासचिव भूषण कर्डिले, विभागीय अध्यक्ष हिंगासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. निलिमा टाके- गुल्हाने या तेली समाजासाठी गौरव असून त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलांमुळे तेली समाजाला एक वेगळी दिशा मिळाली आहे. त्यांच्या कार्यापासून समाजातील इतर महिलांनी प्रेरणा घेऊन यशाचे शिखर गाठावे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. सत्काराला उत्तर देताना निलिमा टाके- गुल्हाने म्हणाल्या की हा सत्कार माझा नसून संपूर्ण कुटुंबाचा व समाजाचा आहे. समाजातील मुलींनी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेत आपला ,आपल्या कुटुंबाचा व समाजाचा नावलौकिक वाढवावा असा मोलाचा सल्ला दिला. समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल निलिमा टाके- गुल्हाने यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.