रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे आयोजन
अमरावती -
रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका व सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणांच्या मनातील बहुविश्वांचा शोध घेणारा 'मनाचा कट्टा' या आगळ्यावेगळ्या एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन बुधवार १३ ऑगस्टरोजी करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडलेल्या या परिसंवादाला शहरातील प्रसिद्ध मानपसोचार तज्ञ डॉ.विक्रम वानखडे यांचे मुख्य मार्गदर्शन लाभले.
तरुणांना प्रेरणादायी ठरणारा, आपले जीवन यशस्वीपणे जगू शकतील असा आत्मविश्वास निर्माण करणारा तसेच तरुणाईच्या मनातील बहूविश्वांचा शोध घेणारा 'मनाचा कट्टा' या एकदिवसीय परिसंवादाला मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.विक्रम वानखडे यांनी आपल्या ज्ञानवर्धक मार्गदर्शनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिपना अभियांत्रीकी महाविद्दालयाचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ विजय गुन्हाने यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे अध्यक्ष अमोल चवणे, प्रा.विजय गुल्हाने, सचिव डॉ.लोभस घडेकर, डॉ.पूजा कोल्हे, सुरेश मेठी, डॉ.पंकज मोरे, निलेश वानखडे, संजय बोरोडे, अतुल कोल्हे उपस्थित होते. परिसंवादाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.