■ पो.निरीक्षक सुरेश म्हस्के पो. उपनि दर्शन दिकोंडवार,यांचे पथकाची कारवाई
अमरावती -
परतवाडा. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी मध्य प्रदेशच्या आगरा जिल्हातील बडोद येथुन अटक केली. रामकिसन कनिराम सोंलकी (32, रा. चिखली सौध्या शाजापुर मध्य प्रदेश) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माहिती अनुसार प्रदीप शामरावजी कराळे (63, सिव्हील लाईन) यांनी परतवाडा ठाण्यात तक्रार दिली होती की, ते तनिष्क कंम्पनीची फेचायझी मिळवुन देण्याचे आमीष देवुन
आरोपीने त्यांना ऑनलाईन 1 लाख 99 हजार 999 रुपयांनी गंडविले. या वरुन पोलीसानी तपास करून आरोपी रामकिसन सोलंकी यांस ताब्यात घेतले.
सदर गुन्ह्याचा तांत्रिक तपास सायबर पोलीस स्टेशन य मार्फत करण्यात आले. बडोद जि. आगर मालवा मध्य प्रदेश येथून आरोपी पकडले. त्यांचे कडुन गुन्ह्यासंबधाने बॅक पास बुक, चेक बुक ताब्यात घेतले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी माधवराव गरुड यांचे मार्गर्शनात पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के यांचे पथकातील पो. उपनि दर्शन दिकोंडवार, पो.ना. अजीत राठोड, पो.कॉ. रोशन लकडे, पो.कॉ. विनोद सुर्यवंशी यांना केली.