कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी ‘स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट’चा आधार

कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी ‘स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट’चा आधार

नांदगाव पेठ / प्रतिनिधी

      सामाजिक बांधिलकी जपत स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कर्करोगग्रस्त रुग्णांना मदतीचा हात देण्यात आला.वाघोली येथील सविता नरेंद्र ठेले आणि कापुसतळणी येथील मालती घोम या दोन्ही महिला कर्करोगाशी झुंज देत असून त्यांच्या उपचारासाठी प्रचंड आर्थिक खर्च होत आहे. अशा वेळी ट्रस्टचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांनी पुढाकार घेत त्यांच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत करून त्यांना धनादेश सुपूर्द केला.
    स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टने केलेली ही मदत म्हणजे केवळ आर्थिक सहाय्य नव्हे, तर रुग्णांच्या जीवनात नवीन आशा निर्माण करणारा एक प्रकाशकिरण ठरला आहे. ही सामाजिक जाणिवेतून उचललेली पावले समाजातील इतर दात्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.आजाराशी झगडणाऱ्या कुणाच्याही हाताला धरून त्यांना जगण्याची उमेद देणे हीच खरी सामाजिक सेवा आहे,असे विचार या वेळी विवेक गुल्हाने यांनी व्यक्त केले.
     या वेळी कार्यकर्ते नागेंद्र तायडे, ज्योती तायडे, विजय झटाले,विजय धोटे,सुधीर खेडकर, तुळशीदास धोटे,उमेश धोटे, विलास घोटे,प्रभाकर ठाकरे, सुनील पोहोकार,दिनकर धोटे, पुरुषोत्तम धोटे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.