दर्यापुर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अखेर पोलीसांनी केली अटक.

दर्यापुर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अखेर पोलीसांनी केली अटक.
अमरावती- 
दर्यापुर.दि २२/०९/२०२५ रोजी अमरावती ग्रा.विभागाचे कार्यक्षेत्रात येणारे दर्यापुर पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी सौरभ राजेश ईगळे वय २८ वर्ष रा सैनिक कालीनी दर्यापुर यांनी रिपोर्ट दिला कि, त्यांचे वडील नामे राजेश ईगळे वय ५४ वर्ष रा सैनिक कॉलनी दर्यापुर यांचा दिनांक २२/०९/२०२५ चे रात्री दरम्यान धंनजय लॉज दर्यापुर चे मागील बाजुस रोडवर कोणीतरी अज्ञात इसमाने जिवाने ठार मारून खुन केला आहे. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन दर्यापुर येथे अप.क. ३८०/२५ कलम ३०१(१) भान्यासं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा पोलीस अधिक्षक सा तथा मा अपर पोलीस अधिक्षक सा, अमरावती ग्रामीण यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन अज्ञात आरोपीचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या आदेशात्मक सुचना स्थानिक गुन्हे शाखेस दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक २३/०९/२०२५ रोजी स्था.गु.शाखेचे चार पथक आणि पो स्टे दर्यापुर चे दोन पथक गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टिने प्रयत्नशिल होते. सतत तिन दिवस नमुद गुन्हयाचे घटनास्थळ शेजारील तथा दर्यापुर शहरातील सिसिटिव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळवत तपास करीत असतांना, पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि, सदर खुन हा तहसिल कार्यालय दर्यापुर नजीक घटनास्थळ शेजारीच राहणारा ओम देशमुख यांने केला आहे, वरुन त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यास सखोल विचारपुस केली असता, ओम देशमुख हा नविन तहसिल कार्यालयासमोरच राहत असुन मयत राजु इंगळे हा तहसिल कार्यालयातच नक्कल विभागात काम करीत असल्याने मागील ५-६ वर्षांपासुन राजु इंगळेची ओळख असल्याचे सांगितले तसेच घटनेदिवशी ओमची मयत याचेसोबत रात्री किरकोळ कामानिमित्त भेट झाली असता, मयत याने बोलतांना सहजपणे ओमच्या वडीलांना शिवीगाळ केली व त्याचा राग मनात धरुन ओम याने लाकडी दांडयाने मयत राजु इंगळे याचे डोक्यावर वार करुन जिवानिशी ठार मारले असल्याची कबुली दिली आहे. आरोपी ओम देशमुख यास पुढील तपासकामी पोलीस स्टेशन दर्यापुर यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पोलीस स्टेशन दर्यापुर करीत आहे
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री विशाल आनंद (भापोसे), मा. अपर पोलीस अधिक्षक श्री पंकज कुमावत (भापोसे), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापुर श्री. सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्वागुशा प्रमुख पोनि. किरण वानखडे, पो स्टे दर्यापुर येथील ठाणेदार पोनि. सुनिल वानखडे यांचे नेतृत्वात सपोनि. सचिन पवार, पोउपनि सागर हटवार, पोउपनि. नितीन इंगोले, पोउपनि. मुलचंद भांबुरकर तसेच पो स्टे दर्यापुर येथील सपोनि. अभय चौथनकर, पोउपनि. विशाल दादंळे आणि पोलीस अंमलदार सुनिल महात्मे, रविंद्र बावणे, बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, सै. अजमत, सुधिर बावणे, चेतन दुबे, निलेश डांगोरे, युवराज मानमोठे, रविन्द्र व-हाडे, स्वप्निल तंवर, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, सागर नाठे, शांताराम सोनोने, पोस्टे. दर्यापुर येथील अंमलदार उमेश वाकंपांजर, सिध्दार्थ आठवले, दिपक रेलकर, चंद्रकांत खंडार, निलेश कावतकर, सतोष वालसिंगे, रवी धानोरकर, पो स्टे सायबर येथील पोहेका सागर धापड, शिवा शिरसाठ, रितेश गोस्वामी, विकास अंजीकर, चालक पोहेकॉ. संजय प्रधान, मनोज घवळे, हर्षद घुसे, पोकों प्रशिक वानखडे यांचे पथकाने पार पाडली