नाशिक जिल्हा राजकीय गुन्हेगारांचा नव्हेकायद्याचाच बालेकिल्ला

नाशिक जिल्हा राजकीय गुन्हेगारांचा नव्हे
कायद्याचाच बालेकिल्ला
■ धडाकेबाज कारवाईतून पोलीस आयुक्तांचा संदेश
 नाशिक - 
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली मोकळीक नाशिकमध्ये प्रत्यक्ष परिणाम दाखवत आहे. ‘गुन्हेगार कोणत्याही पक्षाचे असो, कायद्यापुढे सर्व समान,’ असा स्पष्ट संदेश देताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी धडाकेबाज कामगिरी करत गुन्हेगारांचा कणा मोडला आहे. त्यांच्या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात कमालीचे भीतीचे सावट पसरले आहे. भल्याभल्यांना घाम फुटला असून अनेकांची मस्ती मिटवण्यात पोलीस आयुक्तांना यश आले आहे. इतकेच नव्हे तर, यादीतील गुन्हेगारांनाही विविध पोलीस स्टेशन्समध्ये बोलवून त्यांची कसून चौकशी सुरू झाली आहे. यात आपला नंबर येऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. अवैध धंदे ठप्प, टवाळखोरांविना रस्त्यांवर शांतता आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान अशी दुर्मीळ दृश्ये यानिमित्ताने नाशिककर अनुभवत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा हा राजकीय गुन्हेगारांचा नव्हे, कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे आता नाशिककर अभिमानाने सांगताना दिसतात.
सातपूर गोळीबार : आणखी दोघे अटकेत 
 प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपकसह नऊ जणांना पोलिसांनी केली अटक
 देवेश शिरताटे (दोघेही रा. जेल रोड, नाशिक), शुभम गोसावी यांना अटक
 फरार भूषण लोंढेसह फरार आरोपींचा शोध सुरू
 आकाश अढंगलेसह देवेश, शुभमला १२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
विसेमळा गोळीबार : ५ जणांना अटक
 गौरव बागूल, सागर बागूल, मामा राजवाडे, अमोल पाटीलसह पाच जणांना अटक 
 फरार अजय बागूलसह संशयित आरोपींचा शोध सुरू  गोळीबारप्रकरणात वापरलेली शस्त्र व वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू
 बागूल समर्थकांची पळापळ
 पोलिसांच्या धास्तीने मोबाईल स्विच्ड ऑफ
रील्स, फलकांव्दारे दहशत :
पवन पवार मुंबईत फरार?
 आक्षेपार्ह रील्स व फलकांव्दारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने माजी नगरसेवक पवन व त्याचा भाऊ विशाल पवारविरुद्ध गुन्हा
 फरार पवन पवार मुंबईत उपचार घेत असून,  पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. 
 पोलीस त्याच्या लवकरच आवळणार मुसक्या
 रील्समधील संशयितांचा शोध सुरू
फलकाव्दारे दहशतीचा प्रयत्न : शेवरे, नागरेला घेणार ताब्यात
 विनापरवानगी मराठा हायस्कूल चौक ते अशोकस्तंभपर्यंत लावलेल्या फलकावर माजी नगरसेवक योगेश शेवरे व शिंदे सेनेचे पदाधिकारी विक्रम नागरेचा फोटा  या फलकामुळे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न  सरकारवाडा पोलिसात दोघांवर गुन्हा
सिडकोतील भाजप माजी नगरसेवकाला इशारा
सिडकोतील भाजपच्या एका माजी नगरसेवकाला नाशिक शहर पोलिसांनी सूचक इशारा दिल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून सध्या ‘आॅपरेशन क्लीनअप’ राबविले जात आहे. पोलिसांकडून राजकीय गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार, राजकीय दहशत निर्माण करून गुन्हेगारांना बळ देणारे सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाला पोलिसांना इशारा दिल्याने त्याचे धाबे दणाणले आहेत.