नांदगाव खंडेश्वर येथील मुस्लिम समाजाचे समीर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच

नांदगाव खंडेश्वर  येथील मुस्लिम समाजाचे समीर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच
 परवा दिनांक 27 ऑक्टोबरला माझे सासरे यांना अचानक छातीत दुखत असल्याने आम्ही चांदूरला ढोले साहेबांकडे प्रथम उपचार घेतला आणि लगेच अमरावती रेफर केल्याने एका कार मध्ये अमरावतीसाठी निघालो पण पोहऱ्याच्या समोर अचानक कार फेल पडली, मी लगेच बाहेर निघालो आणि इकडे तिकडे बघायला लागलो तर लगेच एक चार चाकी लोडिंग गाडी आणि एक आवाज "क्या हुआ ठाकरे भाऊ" दोन मिनिट तर मी त्याच्याकडे बघतच राहिलो कारण की मी त्याला ओळखले नव्हते आणि म्हटले की तब्येत सिरीयस आहे आणि गाडी फेल पडली त्याने एका शब्दात म्हटले "अपने गाडी मे लेके चलो मै दवाखाने तक लेके चलता " आणि लगेच आम्ही त्याच्या लोडिंग गाडीत निघालो.
 निघाल्यावर लक्षात आले की हा तर नांदगाव खंडेश्वर येथील समीर आहे ज्याला चार वर्षा आधी मी माझ्या दुकानाचे भाडे द्यायचो त्याने आता मोठी गाडी घेतली होती, जरा गाडी जोरात चालवत त्याने लवकरात लवकर अमरावतीला अक्षय ढोरे सरांकडे पोहोचवले आणि मग तिथे पोहोचताच लगेच उपचार सुरू झाले.....
 मी त्याला म्हटले येथे येण्याचे काही पैसे देऊ का तर त्याचा एक शब्द होता "मेरा जमीर इतना भी खराब नाही"
 आज एका मुस्लिम समाजाच्या मुलाने न बोलता एका हिंदूचा जीव वाचवला.... इथे कुठलाही जात धर्म नाही तर एक माणूस माणसाच्या कामी आला एका माणसाने आपली माणुसकी दाखवत माणसाचा जीव वाचवला.
 मग आता कुठला हिंदू खतर्यामध्ये आहे आणि कोणता मुसलमान,
 फक्त राजकारणासाठी जात धर्म वापरणारे जे कलंकी लोक आहेत त्यांनी जरा या प्रसंगावरून शिकवण घ्यावी आमच्यासाठी तर तो व्यक्ती एक ईश्वर,अल्लाह चे रूप घेऊन आला.....
 खरंच समीरभाऊ तुझे खूप खूप आभार अशीच वेळोवेळी अनेकांना हिंदू मुस्लिम एक्क्याची प्रासंगिकता घडो आणि सर्व बंधू भावाने राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना......