मध्यवर्ती कारागृहात ‘मानवी हक्क आणि संरक्षण’बाबत जागृती

मध्यवर्ती कारागृहात ‘मानवी हक्क आणि संरक्षण’बाबत जागृती

अमरावती, दि. 10 
 विधी सेवा प्राधिकरण आणि मानवी हक्क आयोग, तसेच कारागृह विभागातर्फे आज कारागृहातील बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून बंद्यांचे ‘मानवी हक्क आणि संरक्षण’ याबाबत कायदेविषयक जागृती करण्यात आली.
बंद्यांना मानवी हक्काची माहिती व्हावी, यासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलिस आयुक्त अरविंद चावरीया, अधीक्षक किर्ती चिंतामणी, अॅड. अमित सहारकर उपस्थित होते.
पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी कारागृहातील बंद्यांना शिस्तीचे वर्तन करुन नियमाचे पालन करावे. मानवी अधिकाराचे उल्लंघन झाल्यास कायदा आहे, त्यामूळे कोणाच्याही अधिकाराचे उल्लंघन करु नये, सर्व धर्मग्रंथाचे वाचन केल्यास मानवी मुल्य जपली जातील. तसेच स्वत:मधील मीपणाची भावना कमी झाल्यास मानवी मुल्ये जपता येतील, असे सांगितले. न्यायरक्षक कार्यालयाचे अॅड. अमित सहारकर यांनी, बंद्यांचे कारागृहातील हक्क व कर्तव्ये या विषयी माहिती दिली. 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. एस. वमने यांनी प्रास्ताविक केले. कारागृह शिक्षक ललित मुंडे यांनी सुत्रसंचालन केले. कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी आभार मानले. कारागृहातील उपअधीक्षक प्रदिप इंगळे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव, शामराव गिते, मंडल तुरुंगाधिकारी धनसिंग कवाळे, कारागृह शिक्षक संजय घोलप, प्रवीण धर्माळे, गोपाल कचरे, सुभेदार राहूल पंधरे, उमेश साबळे, कृष्णकांत सांबारे, पवन ईखार, यादव कातोरे यांनी पुढाकार घेतला.