जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार-पालक सचिव आय. ए. कुंदनअमरावती,

जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार
-पालक सचिव आय. ए. कुंदन

अमरावती -
जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. यात जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती पालक सचिव आय. ए. कुंदनन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीमती कुंदन यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते.
सुरवातीला जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील पीएम मित्रा पार्क, चिखलदरा येथील स्कायवॉक, मेळघाटातील 25 गावाचा विजेचा प्रश्न, ईको टुरीझम आणि मेळाघाटातील आरोग्य, दळणवळण, विजेच्या प्रश्नाबाबत माहिती दिली. प्रामुख्याने मेळघाटातील पायाभूत सुविधांसाठी राज्य वन्यजीव मंडळाची बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांना आवश्यक असलेल्या परवागीसाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाकडे पाठविण्याची विनंती केली. तसेच ईको टुरीझमसाठी आवश्यक असणारा 50 कोटी रूपयांचा निधी देण्यात यावा. जिल्ह्यात उद्योगाचे वातावरण होण्यासाठी मोठा उद्योग येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हा परिषदेत प्रामुख्याने वैद्यकीय पदांची भरती शासनस्तरावरून करण्यात यावी. यामुळे वैद्यकीय सुविधा सुधारण्यास मदत मिळेल. महापालिकेतील प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी मिळावी. दुकाने व गाळ्यांची लिजची मुदत 2018मध्ये संपली असल्याने याबाबत शासनाची तातडीने परवागनी मिळावी, यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी औद्योगिक सुरक्षा मंडळाचा आढावा घेण्यात आला.