मुख्य रस्त्याचे मध्यभागी असलेल्या बेग नाला परिसरातील कचरा साफ करा - नगरसेविका - सौ.प्रांजली राहुल गुल्हाने


नांदगाव खंडेश्वर - 
तालुका प्रतिनिधी 

नांदगाव खंडेश्वर येथील नगर पंचायतचे कार्यक्षेत्रात येणार्या प्रभाग क्रमांक १३ व १४ च्या मध्यभागी असलेला मुख्य रस्ता अण्णाभाऊ साठे नागरी दलीत वस्तीतील भिमरावजी जेवडे ते अमरावती रोड लगत असलेला बेग नाल्याचे आसपासचे सार्वजनिक ठिकाणी घन कचरा मोठ्या प्रमाणात साठला आहे. या कचऱ्यामुळे आजु बाजुचे परिसरात दुर्गंधी पसरली असून, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर कचऱ्यामुळे व रस्त्याने उडणारे धुळ मुळे रस्त्याने येजा करणार्या नागरिकांना व शाळकरी मुला मुलींना याचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे , त्याचप्रमाणे दिवसान दिवस डास, कीटक यांचा प्रादुर्भाव. सुद्धा वाढत असल्यामुळे, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.आरोग्याचा दृष्टीकोन लक्षात घेता त्वरित या समस्येकडे लक्ष देऊन सदर कचरा साफ करून घ्यावा आणि भविष्यात नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी एका लेखी निवेदनाव्दारे नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मुख्याधिकारी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्याकडे केली आहे.