नांदगाव खंडेश्वर शहरातील स्मशान भूमी व दफन भूम्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करा - नगरसेविका - सौ.प्राजली गुल्हाने


नांदगाव खंडे -  तालुका प्रतिनिधी 
नांदगाव खंडेश्वर  नगर पंचायतचे कार्यक्षेत्रातील स्थानिक शहरातील जवळ पास सर्वच हिंदू स्मशान भूमी,बौद्ध धर्म दफन भूमी, मुस्लिम कब्रस्तान दफन भूमी, येथील स्वच्छतेची अत्यंत वाईट स्थिती  झालेली आहे.जिकडे तिकडे घानिचे सामराज्य आहे. शहरातील स्मशान भूम्यांमध्ये घाण, झाडे झुडपे वाढुन तण आणि कचऱ्याने भरलेल्या आहे.
ज्यामुळे त्या जागा अस्वच्छ झालेल्या आहे. शहरातील दफन भूम्या व स्मशानभूम्या ह्या आपल्या नांदगाव खंडेश्वर शहरातील सर्व जाती धर्मातील समुदायातील मृतांसाठी अंतिम विश्रांती स्थळ आहे. आणि त्यांचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत, देशभरात स्वच्छतेवर भर दिला जात आहे.
म्हणून, आपण या प्रकरणात लक्ष द्या आणि शहरातील सर्व दफन भूमी, स्मशान भूम्यांची,पूर्णपणे स्वच्छता,वाढलेले गवत झाडे झुडपे छटाई करुन साचलेला कचरा काढून टाकण्यासाठी त्वरित कारवाई करा.मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची दुर्गंधी पसरते. रात्रीच्या वेळी या भागात पुरेसा प्रकाशही नसतो. येथे नियमित स्वच्छताही ठेवली जात नाही. 
यामुळे अनेकांची कुचंबणा होते. तरी या प्रश्नाकडे नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन स्मशानभूमीची दुरुस्ती करून शुशोभीकरण करावे; वाटल्यास आम्ही, यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. अशी मागणी नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्याधिकारी नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर यांच्या केली आहे.