निवडणूक होताच कामाला सुरुवात! कुरेशी लोकवस्ती परिसरातील नाली सफाईला गती

निवडणूक होताच कामाला सुरुवात! कुरेशी लोकवस्ती परिसरातील नाली सफाईला गती

दरमहिण्याला होणार प्रभागातील नाल्यांची साफसफाई - नगरसेविका - सौ.प्रांजली गुल्हाने 
नांदगाव खंडेश्वर -  तालुका प्रतिनिधी 

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतचे प्रभाग क्रमांक १४ मधील कुरेशी लोकवस्ती परिसरात साचलेल्या कचरा व गाळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र निवडणूक होताच लोकप्रतिनिधींनी आपली कार्यतत्परता दाखवत थेट कामाला सुरुवात केली आहे. प्रभागाचे नगरसेविका सौ.प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या पुढाकारातून त्यांनी नगर पंचायतला केलेला पत्रव्यवहाराची मुख्याधिकारी यांनी तात्काळ दखल घेत येथील नाल्यांची सखोल साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. सदरचे परिसरातील नाल्यांच्या सफाईमुळे पाणी साचणे, दुर्गंधी तसेच आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. प्रभागातील स्थानिक नागरिकांनी या तात्काळ केलेल्या कारवाईचे स्वागत करत, “निवडणूक संपताच कामाला लागणारे लोकप्रतिनिधी म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी सांगितले की, प्रभागातील मूलभूत सुविधा सुधारणे हेच आमचे प्राधान्य असून स्वच्छता, पाणी निचरा व आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम केले जाईल.
प्रभागातील परिसरातील नाल्या सफाईचे हे काम म्हणजे वचनपूर्तीची सुरुवात असून, प्रभाग क्रमांक १४ च्या सर्वांगीण विकासाचा ठोस संदेश यातून नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.