मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी बंद पडलेले पोर्टल तात्काळ सुरू करा - नगरसेविका, सौ.प्रांजली राहुल गुल्हाने

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी बंद पडलेले पोर्टल तात्काळ सुरू करा -  नगरसेविका, सौ.प्रांजली राहुल गुल्हाने 

 नांदगाव खंडेश्वर
 ( तालुका प्रतिनिधी ) 
 गेल्या काही महिण्यापासुन अनेक पात्र महिलांना तांत्रिक अडचणींमुळे, विशेषत ई-केवायसी (e-KYC) प्रलंबित असल्याने, लाभ मिळालेला नाही.
यावर कार्यवाई करत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे.आणि पडताळणी प्रक्रियेद्वारे थकीत हप्ते त्वरित जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. सदरचे लाडकी बहीण योजनेचे पोर्टल काही काळासाठी बंद असल्याने नवीन अर्ज आणि पडताळणी प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण नाही, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही, त्यामुळे त्वरित ई-केवायसी पूर्ण करा.गेल्या काही महिन्यांपासून लाभ वेळेत न मिळाल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती. पडताळणी करून तात्काळ कार्यवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र पोर्टल बंद असल्यामुळे महिलाची गैरसोय होत आहे.  महिलांची गैरसोय टाळण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे प्रलंबित हप्ते मिळण्यासाठी बंद असलेले पोर्टल पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
  महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ मिळण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. नांदगाव खंडेश्वर शहरासह  तालुक्यातील अनेक महिलांनी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात अद्याप योजनेचे हप्ते जमा झालेले नाहीत. पात्र असूनही लाभापासून वंचित राहिल्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे. 
अर्ज करण्यासाठी आणि त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शासनाचे पोर्टल सध्या बंद आहे. त्यामुळे  पात्र महिलांना अर्ज करता येत नाहीये, तरी हे पोर्टल तात्काळ सुरू करण्यात यावे. तांत्रिक कारणास्तव अनेक भगिनींचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. या अर्जांची फेरतपासणी करून त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील सर्व पात्र भगिनींना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशी विनंती. एका लेखी पत्राव्दारे तालुका प्रशासन अधिकारी यांना सौ.प्रांजली राहुल गुल्हाने नगरसेविका प्रभाग क्रमांक - १४ नांदगाव खंडेश्वर यांनी केली आहे