काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक ! समीर पाटील दहातोंडे यांच्या निवडीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यात काँग्रेसला मिळणार नवसंजीवनी ; नगरसेविका प्रांजली गुल्हाने
नांदगाव खंडेश्वर ▪
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांचे समीकरण लक्षात घेऊन नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्षपदी समीर पाटील दहातोंडे यांची नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात काँग्रेसला एक 'पावरबाज' नेतृत्व मिळाले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. समीर पाटील दहातोंडे यांचा ग्रामीण भागातील जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेली नाळ पाहता, आगामी काळात काँग्रेस पक्ष तालुक्यात अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे ग्रामीण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नगरसेविका प्रांजली राहुल गुल्हाने यांनी व्यक्त केला आनंद
या निवडीचे स्वागत करताना नगर पंचायत नांदगाव खंडेश्वरच्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, आमचे नेते माजी तालुका अध्यक्ष निशिकांतभाऊ जाधव यांच्या नंतर ग्रामीण क्षेत्राचा अनुभव असणारे अभ्यासु व्यक्तिमत्व "समीर पाटील दहातोंडे यांच्यासारख्या अभ्यासू आणि कार्यक्षम व्यक्तीच्या खांद्यावर तालुक्याची धुरा सोपवल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवू आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू."
ग्रामीण भागात 'पावरबाज' एन्ट्री
तालुक्यातील ग्रामीण राजकारणात समीर पाटील दहातोंडे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची संघटनात्मक बांधणी करण्याची पद्धत आणि तरुणांमधील लोकप्रियता पाहता, ही नियुक्ती विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.