🚨 सतर्क राहा! वीज तारा चोरणाऱ्या टोळीचा सुळसुळाट; लोणी पोलिसांचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन 🚨

🚨 सतर्क राहा! वीज तारा चोरणाऱ्या टोळीचा सुळसुळाट; लोणी पोलिसांचे नागरिकांना खबरदारीचे आवाहन 🚨

लोणी: गेल्या काही दिवसांपासून लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेत शिवारात सिमेंटचे खांब पाडून त्यावरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोणी पोलिसांनी कंबर कसली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ग्रामीण भागात गस्त (पेट्रोलिंग) वाढवण्यात आली आहे. मात्र, या मोहिमेत नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
पोलीस प्रशासनाची विनंती :
तुमच्या परिसरात, शेत शिवारात रात्री किंवा दिवसा कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन फिरताना आढळल्यास, त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.
संपर्क करा:
📞 सपोनि सतिश खेडेकर (ठाणेदार): 9028430672
📞 पी.एस.आय. प्रविण मोरे: 84594 56604
तुमची एक सतर्कता चोरीची मोठी घटना रोखू शकते!