छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबाचा नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निषेध ; तहसीलदारांमार्फत कारवाईची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस महासचिव परिक्षित जगताप यांचे नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तहसिलवर धडक
नांदगाव खंडेश्वर :
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत चुकीचे, तथ्यहीन आणि अवमानकारक विधान करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ 'बागेश्वर बाबा' याच्या विरोधात आज नांदगाव खंडेश्वर तालुका काँग्रेस कमेटी आणि युवक काँग्रेस कमेटी व नांदगाव खंडेश्वर शहर कॉंग्रेस कमेटीचे वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देऊन शास्त्रीवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने "शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवून राज्यकारभार पाहण्याची विनंती केली," असे विवादित विधान केले होते. या विधानामुळे शिवप्रेमींमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
ऐतिहासिक विकृतीकरणाचा प्रयत्न:
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, "महाराजांनी कधीही कोणासमोर शरणागती पत्करली नव्हती. हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या पूर्णपणे खोटा असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालणारा आहे. यापूर्वीही १७ मार्च २०२३ रोजी याच व्यक्तीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीबद्दल खालच्या पातळीवरचे विधान करून वारकरी संप्रदायाचा अपमान केला होता. महापुरुषांचा वारंवार अपमान करणे हा या व्यक्तीचा जाणूनबुजून केलेला खोडसाळपणा आहे."
आंदोलनाचा इशारा:
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्रीवर गुन्हा दाखल करावा आणि त्याने जाहीर माफी मागावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस महासचिव परिक्षित जगताप यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष समिर पाटील ( दहातोंडे ) युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिपक भगत व शहर कॉंग्रेस कमेटी शहर अध्यक्ष अमोल धवसे,निशांत जाधव यांच्या मार्गदर्शनात नगर पंचायत नांदगाव खंडेश्वर चे बांधकाम सभापती मो.रियाज मो.मुमताज, माजी सरपंच सुशिल थोरात, राहुल गुल्हाने, शेख हारुन शेख युसुब,मो.ईद्रिसभाई,तनविर माजी उपसरपंच शिवाजी चव्हाण पटेल,मो.सलिम,या.या.रशिद कुरेशी,युनुस सर ,गजानन चव्हान,नरेंद्र थोरात,प्रदिप ब्राम्हवाडे,अमोल गुल्हाने ,बाबु पवार,बाल्या पवार,जितेंद्र चितोडीया नंदु रावेकर, शेख रहुफ, मंगेश जोगे,मोफिक पठाण,पारस चौधरी,दिपकराव सवई,गजानन भडके,संजय कुंभलकर,रुक्षीकेश मुंदे प्रकाश ओलीवकर सुनिल शिरभाते,मोरेश्वर डिवटे,सलिम खा चांदखा, रमेश ठाकरे,अजर अली कौसर अली, मनोहर बगळे,विजय चिंचे,निलेश मेंढे,मुस्तुफाभाई,पवन कारेकर, नांदगाव खंडेश्वर यांनी दिला आहे.यावेळी काँग्रेसचे ग्रामीण व शहरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.